ETV Bharat / bharat

अमेरिकेत प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात बाळ; पोलिसांनी नाव ठेवले 'इंडिया' - Georgia

अमेरिकेतील जॉर्जीया येथे पोलिसांना एका प्लास्टिकच्या पिशवीत नवजात मुलगी सापडली आहे. अमेरिकन पोलिसांनी या मुलीचे नाव 'इंडीया' असे ठेवले आहे.

'इंडिया'
author img

By

Published : Jun 27, 2019, 1:03 PM IST

Updated : Jun 27, 2019, 1:20 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेतील जॉर्जीया येथे पोलिसांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नवजात मुलगी सापडली आहे. अमेरिकन पोलिसांनी या मुलीचे नाव इंडीया असे ठेवले आहे. त्या मुलीच्या आईचा शोध लावण्यासाठी मुलगी 'इंडिया'चा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अमेरिकन पोलिसांना 6 जुन रोजी जंगलामध्ये एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. यानंतर तेथे पाहिले असता त्यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नवजात मुलगी आढळून आली. पोलिसांच्या शरिरावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये बाळाचा व्हिडीओ रेकार्ड झाला आहे. हा व्हिडीओ पोलिसांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

  • #FCSO is continuing to investigate & follow leads regarding #BabyIndia We're happy to report she is thriving & is in the care of GADFACS. By releasing the body cam footage from the discovery of Baby India we hope to receive credible info & find closure. https://t.co/ICI42mjxSv

    — ForsythCountySO (@ForsythCountySO) June 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हिडीओमध्ये एक अधिकारी त्या मुलीला पिशवीतून बाहेर काढतानाचे दृश्य आहे. 'पहा किती सुंदर बाळ आहे. मला या बाळाची ही स्थिती पाहून दु:ख होत आहे', असा त्या अधिकाऱ्यांचा आवजा व्हिडिओ पाहताना ऐकायला येतो.

मुलीच्या आई- वडिलांचा शोध सुरु असून तीचे नाव इंडिया ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून #BabyIndia या हॅशटॅगसह शेअर होत आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 27, 2019, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.