नवी दिल्ली - देशभरामध्ये मागील 24 तासात तब्बल 386 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 637 वर पोहचले आहे. मात्र, देशभरात सर्वच ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत नसून फक्त दिल्लीतील तबलीघी जमात कार्यक्रमाला गेलेल्या नागरिकांना कोरोना झालेल्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे, असे आरोग्या मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी आज(बुधवार) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. भारतीय रेल्वे 3 लाख 20 हजार बेड रुग्णांना ठेवण्यासाठी तयार करत असल्याची माहीत अगरवाल यांनी दिली. तबलिघी जमात संघटनने दिल्लीतील मकरज निझामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक विदेशी नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यातील अनेकांना कोरोनाची लागण असल्याने भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे.