- ७.४२ - मोदींनी सर्वाचे आभार मानत भाषण संपवले.
- सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत आपल्याला विकसित बनायचे आहे - नरेंद्र मोदी
- आपल्याला विकसनशील रहायचे नाही - नरेंद्र मोदी
- जाती-धर्माच्या नावावर भेदभाव होणार नाही - नरेंद्र मोदी
- माझे सरकार दलित, शोषित आणि वंचितांना समर्पित - नरेंद्र मोदी
- रांगेत उभे राहायला लाजू नका, नागरिक आहात तर लाजता कशाला - नरेंद्र मोदी
- व्हीआयपी संस्कृतीचा जनतेला तिरस्कार, मनोहर पर्रीकरांच्या साधेपणाचा आदर्श ठेवा - नरेंद्र मोदी
- माध्यमात आलेल्या भावी मंत्रीमंडळाच्या बातम्या खोट्या - नरेंद्र मोदी
- वाचाळवीरांमुळे एनडीएच्या अडचणीत वाढ झाली आहे - नरेंद्र मोदी
- तुम्ही मोदीमुळे नाही जनतेमुळे आहात, जुन्या-नव्या खासदारांनो प्रसिद्धीपासून दुर राहा - नरेंद्र मोदी
- एनडीए देशात आंदोलन बनले आहे, एनडीए म्हणजे एनर्जी प्लस सिनर्जी - नरेंद्र मोदी
- जगात ऑफ द रेकॉर्ड काही नसते - नरेंद्र मोदी
- आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. चुक झाली तर देश माफ करणार नाही - नरेंद्र मोदी
- जागतिकदृष्टीने बघितले तर मोदींची वाढ झाली आहे - नरेंद्र मोदी
- नरेंद्र मोदींनी अमेरिकेतल्या निवडणुकांशी केली तुलना. म्हणाले, जेवढी ट्रम्पला मते मिळाली आहेत तेवढी तर आमची वाढ आहे.
- देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला संसदेत, या निवडणुकीत मातृशक्तीने देशाचे भविष्य ठरवले - नरेंद्र मोदी
- नरेंद्र मोदींनी स्वत:ला आव्हान केले आणि २०१९ ला २०१४ चे सर्व विक्रम मोडले - नरेंद्र मोदी
- २०१९ ची निवडणूक माझ्या जीवनातील तीर्थयात्रा - नरेंद्र मोदी
- माझे भारतभ्रमण तीर्थयात्रेसमान होते - नरेंद्र मोदी
- मी मत मागण्यासाठी दौरे करत नाही - नरेंद्र मोदी
- सबका साथ सबका विश्वास जगाने मान्य केला आहे - नरेंद्र मोदी
- कुठलाही भेदभाव न करता हे सरकार काम करेल - नरेंद्र मोदी
- जनसेवा हेच लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य - नरेंद्र मोदी
- २०१४ ते २०१९ जनतेनं सरकार चालवले, जनता आणि सरकारमध्ये विश्वासाचे नाते - नरेंद्र मोदी
- तुमचा विश्वास सार्थ ठरवणार आहे - नरेंद्र मोदी
- देशाची लोकशाही परिपक्व होतेय, प्रचंड जनादेश मिळाल्यामुळे जबाबदारी वाढली आहे - नरेंद्र मोदी
- मी तुमच्यातीलच एक आहे. आपल्याला खांद्याला खांदा लावून चालायचे आहे - नरेंद्र मोदी
- मी नव्या भारताच्या संकल्पनेला सुरुवात करतोय - नरेंद्र मोदी
- देशात प्रचंड मोठा राजकीय बदल - नरेंद्र मोदी
- मी संविधानाला प्रणाम करतो - नरेंद्र मोदी
- सेंट्रल हॉलची ही ऐतिहासिक घटना, मी सगळ्यांचे आभार मानतो - नरेंद्र मोदी
- ६.२७ - पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणाला सुरुवात
- ६.२६ - सर्वांचे आभार मानत अमित शाहंनी भाषण आटोपले
- मोदींनी २० वर्षात एकही सुट्टी घेतली नाही - अमित शाह
- मोदींनी देशाची मनापासून सेवा केली, मोदींनी ठेवलेले संकल्प पूर्ण केले - अमित शाह
- हा विजय म्हणजे २२ कोटी गरीब जनतेने दिलेला आशीर्वाद - अमित शाह
- मोदींच्या ७ पिढ्यांनी राजकारण केले नाही, नाव न घेता गांधी कुटुंबावर शाहंचा टोला
- सबका साथ, सबका विकास मंत्र राबवला, जनतेने नरेंद्र मोदी प्रयोग यशस्वी करुन दाखवला - अमित शाह
- एवढ्या मोठ्या बहुमताने विजयी होणे ऐतिहासिक, ३०३ खासदार निवडूण येणे हा प्रचंड जनादेश - अमित शाह
- ६.११ - अमित शाहंचे भाषण सुरू, संसदीय नेतेपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र मोदींना दिल्या शुभेच्छा
- ६.०४ - अनेक पक्षप्रमुखांसह दिग्गजांनी पुष्पगुच्छ देत मोदींचे केले अभिनंदन
- ६.०२ - अमित शाह यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी निवडल्याबद्दल सर्वांचे मानले आभार
- ६.०१ - सर्व खासदारांचे उभे राहून मोदींना समर्थन
- ५.५८ - शिरोमणी दलचे प्रमुख प्रकाशसिंह बादल, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, नितिश कुमार आणि रामविलास पासवान यांच्यासह अनेक दिग्गजांचे एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदींना समर्थन
- ५.५५ - नरेंद्र मोदींची संसदीय नेतेपदी निवड
- ५.५२ - अमित शाहंचा प्रस्ताव, गडकरी, राजनाथसिंह यांचे समर्थन
- ५.५० - नरेंद्र मोदींना संसदीय नेतेपदी निवडण्याचा प्रस्ताव
बैठकीला भाजपसह एनडीएचे सर्व दिग्गज नेते उपस्थित आहेत. १७ व्या लोकसभेची स्थापना ३ जूनपर्यंत केली जाणार असून या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत मंत्रिमडळ स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डावलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.