भोपाळ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आदिवासींना संयुक्त राष्ट्रांकडून स्थानिक असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीला पाठिंबा दर्शवला. ते काल (रविवार) मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये बोलत होते. "आदिवासी हे देशातील मूळ रहिवासी आहेत, आम्ही संयुक्त राष्ट्रांकडून त्यांचे स्थानिकत्व ओळखण्याच्या त्यांच्या मागणीला समर्थन देतो," असे पवार यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी संसदेच्या प्रांगणात टंट्या भील यांसारख्या समाजसुधारकांचे पुतळे उभारण्यात यावेत, अशी मागणीही केली. "२६ जानेवारी हा दिवस टंट्या भील यांची जयंती म्हणूनही देशभरात साजरा होत आहे. मी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींशी चर्चा करण्याचा प्रयत्न करेल, आणि टंट्या भील यांच्या सारखे समाजसुधारक ज्यांनी देशासाठी योगदान दिले आहे, त्यांचे पुतळे संसदेच्या प्रांगणात उभारण्यात यावेत अशी मागणी करेल." असे पवार म्हणाले. ते टंट्या भील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
टंट्या भील आणि आपल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही मध्य प्रदेशच्या मातीत जन्माला आले होते. मला वाटते, की आपल्या समाजाच्या विकासासाठी आपण काही पावले उचलणे गरजेचे आहे. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार हे राज्यातील आदिवासींसाठी काम करेल, असे पवार यावेळी म्हणाले.
टंट्या हे एका स्थानिक आदिवासी समाज, 'भील पाड्या'चे सदस्य होते. १८५७च्या उठावातील त्यांचे कार्य आणि एकूण समाजसुधारणेसाठी त्यांच्या असलेल्या योगदानासाठी ते ओळखले जातात.
हेही वाचा : आपण आधीच पाकिस्तानी मुस्लिमांना नागरिकत्व देत आहोत, मग 'सीएए'ची गरज काय?