ETV Bharat / bharat

...अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा - sidhu quits punjab cabinet

सिद्धू यांच्याकडे ऊर्जा आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार एका महिन्यापूर्वीच सोपवण्यात आला होता. मात्र, सिद्धू यांचे खाते बदलण्यात आल्यानंतर त्यांची पदावरून अवनती झाल्याची भावना झाल्याने त्यांनी तो पदभार अद्याप स्वीकारला नव्हता.

नवज्योत सिंग सिद्धू
author img

By

Published : Jul 14, 2019, 1:02 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे पंजाब मंत्रिमंडळातील नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी अखेरीस मंत्रिपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी बऱ्याच काळापासून चाललेल्या वादानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे. सिद्धू यांनी स्वतःच्या ट्विटरवरून १० जूनला दिलेले एका ओळीचे राजीनाम्याचे पत्र शेअर केले आहे. तसेच, लवकरच हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

navjot singh sidhu
सिद्धू यांचा राजीनामा
सिद्धू यांचे खाते नुकतेच बदलण्यात आले होते. त्यांच्याकडे ऊर्जा आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार एका महिन्यापूर्वीच सोपवण्यात आला होता. मात्र, सिद्धू यांचे खाते बदलण्यात आल्यानंतर त्यांची पदावरून अवनती झाल्याची भावना झाल्याने त्यांनी तो पदभार अद्याप स्वीकारला नव्हता. त्यांनी काही दिवसांपूर्वी तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली होती. मात्र, फारसा उपयोग झाला नाही. अखेर बंड करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे पसंत केले आहे.

Intro:Body:

...अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.