श्रीनगर - सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. अनंतनागमध्ये डोवाल स्थानिक लोकांशी चर्चा करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डोवाल हे अनंतनागमधील लोकांशी सुरक्षा आणि तेथील सद्याच्या स्थितीबीबत चर्चा करत आहेत.
अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतले समजले जातात. ३७० कमल हटवल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डोवाल हे गेले आहेत. तेथील सुरक्षेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. याठिकाणी बकरी ईदसाठी मेंढी विकण्यासाठी आलेल्या मेंढपाळांशी सुद्धा अजित डोवाल यांनी संवाद साधला. विशेष, म्हणजे दोन दिवसांपूर्वी अजित डोवाल हे जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे गेले होते. यावेळीही त्यांनी लोकांशी चर्चा करुन त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला होता.
चार दिवसांपासून अजित डोवाल जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. याआधी गेल्या महिन्यात अजित डोवाल जम्मू-काश्मीरला गेले होते. त्यानंतर अजित डोवाल दिल्लीला परतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात करण्यात आले. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सांगण्यात आले. कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे