नवी दिल्ली - मंत्रिमडळाच्या खातेवाटपानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली कामकाज बैठक आज (बुधवार) आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत सरकराच्या आगामी काळातील लघु व दिर्घकालीन कार्यक्रमांची चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजीत करण्यात आली आहे. काल पंतप्राधानानी सर्व खात्यांच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर आज ही बैठक आयोजीत करण्यात आली आहे. येत्या ५ जुलैला संसदेत मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
नवीन सरकारच्या कार्यकाळातील हा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प असेल. या अर्थसंकल्पावरून विद्यमान एनडीए सरकारच्या आगामी ५ वर्षांतील कामकाजाची रुपरेषा कशी असेल याचा अंदाज बांधता येईल. या सरकरापुढे १० अध्यादेशांचे कायद्यात रुपांतर करण्यासंबंधीच्या महत्वपूर्ण विधेयकांवर निर्णय घेण्याची प्रमुख जबाबदारीसुद्धा आहे. ही विधेयके पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात सादर केली जातील.