ETV Bharat / bharat

'हैदराबादचा महापौर भाजपाचाच असेल, शहराला निझाम संस्कृतीतून मुक्त करू'

माहिती तंत्रज्ञानाचे हब बनण्याची क्षमता हैदराबाद शहरात आहे. मात्र, टीआरएस आणि काँग्रेसची सत्ता असलेली महानगरपालिका शहराच्या विकासात खोडा घालत आहे, असा आरोप अमित शाह यांनी केला.

अमित शाह
अमित शाह
author img

By

Published : Nov 29, 2020, 5:36 PM IST

Updated : Nov 29, 2020, 7:12 PM IST

हैदराबाद - माहिती तंत्रज्ञानाचे हब बनण्याची क्षमता हैदराबाद शहरात आहे. मात्र, टीआरएस आणि काँग्रेसची सत्ता असलेली महानगरपालिका शहराच्या विकासात खोडा घालत आहे, असा आरोप अमित शाह यांनी केला. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ते हैदराबाद शहरात आले आहेत. त्यांनी शहरात रोड शो केल्यानंतर पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली. पुढचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमित शाह पत्रकार परिषद

बदल घडवण्यासाठी भाजपला मतदान करा -

भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल मी हैदराबादकरांचे आभार मानतो. मला विश्वास आहे की, या रोड शो नंतर भाजप फक्त जास्त जागांसाठी लढणार नसून शहराचा महापौर भाजपाचा असेल, असे अमित शाह म्हणाले. बदल घडवण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

एमआयएमकडून शहरात अतिक्रमण -

विमानतळावर अमित शाह यांचे स्वागत करताना भाजप कार्यकर्ते

हैदराबादला जगाचे आयटी हब बनवण्यात टीआरएस आणि एमआयएम अडथळे आणण्यात येत आहेत. एमआयएम पक्षाने अवैध बांधकाम आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले आहे. भाजपाला पाठिंबा द्या, मी सर्व नागरिकांना विनंती करतो. हैदराबाद जेव्हा कठीण काळातून जात होते तेव्हा असदुद्दीन ओवैसी आणि मुख्यमंत्री कोठे होते, असा सवाल त्यांनी केला आहे. हैदराबादमध्ये आम्ही सुशासन आणू तसेच शहराला पुन्हा आयटी हब बनवू. 'सिटझन चार्टर' नागरिकांना देण्याचे वचन सरकारने दिले होते. त्याचे काय झाले. ३२ हजार पाण्याचे कनेक्शन देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते त्याचे काय झाले, असे सवाल अमित शाह यांनी टीआरएसला केले.

भाग्यलक्ष्मी मंदिरात पुजा करताना अमित शाह

निझाम संस्कृती हद्दपार करू

यावेळी अमित शाह यांनी एमआयएम पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. हैदराबाद शहरातून निझाम संस्कृती हद्दपार करून आधुनिक आणि नवे शहर विकसित करू. कोणाचीही खूशामत न करता घराणेशाही हैदराबादच्या राजकारणातून हद्दपार करू, असे अमित शाह म्हणाले.

Last Updated : Nov 29, 2020, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.