भोपाळ - दारूच्या व्यापारासंबंधी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत कमलनाथ सरकार कायम चर्चेत राहिले आहे. यातच उत्तर प्रदेश सरकार महिलांसाठी स्वतंत्र्य दारूची दुकाने सुरू करणार असल्याच्या अफवा पसरल्या गेल्या होत्या. मात्र, तसे काही होणार नसल्याचे जनसंपर्क मंत्री पी.सी. शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दुसऱ्या एका कारणामुळे सरकारवर टीका केली जात आहे.
महिलांसाठी विशेष दारूची दुकाने सुरू करणार नसल्याचे शर्मांनी स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी, महागडी दारू पिणाऱ्यांसाठी इंदौर आणि भोपाळच्या मॉल्समध्येही दारूची दुकाने उपलब्ध करून देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. यावरून आता सरकारवर टीका होत आहे. सरकारला शेतकरी, बेरोजगार तरुण या सर्वांपेक्षा तळीरामांचीच जास्त काळजी असल्याची टीका केली जात आहे.
यावेळी बोलताना शर्मांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने स्वच्छता मिशनसाठी केवळ २७ कोटी रूपये दिले आहेत, जे चुकीचे आहे असे ते म्हटले. याआधी सरकारने दारूची ३०० नवी दुकाने उघडण्याची घोषणा केली होती. याविरोधात भाजपने तीव्र आंदोलन केले होते. आता कमलनाथ सरकारने विदेशी दारूसाठी नवीन दुकाने उघडण्याचे सांगून विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे.
हेही वाचा : दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ४२ वर, काँग्रेस प्रतिनिधींची हिंसाचारग्रस्त भागाला भेट