नवी दिल्ली - देशभरामध्ये आत्तापर्यंत 3 हजार 113 कोरोनाग्रस्त आढळून आले असून आज दिवसभरात 11 हजार 182 जणांची चाचणी घेण्यात आल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिली आहे. या 11 हजार 182 जणांपैकी 324 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
-
Total number of #COVID19 cases across India rises to 3,113: Indian Council of Medical Research (ICMR) https://t.co/J7naPnaZM9
— ANI (@ANI) April 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Total number of #COVID19 cases across India rises to 3,113: Indian Council of Medical Research (ICMR) https://t.co/J7naPnaZM9
— ANI (@ANI) April 4, 2020Total number of #COVID19 cases across India rises to 3,113: Indian Council of Medical Research (ICMR) https://t.co/J7naPnaZM9
— ANI (@ANI) April 4, 2020
काही भागांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त झाला आहे. येथील नागरिकांची चाचणी घेण्यासंबधी आयसीएमआरने नवी रणनीती तयार केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीही चाचणी घेताना कोणती काळजी घ्यावी यासंबधी नियमावली जारी केली आहे. नव्या रणनीतीनुसार संभाव्य कोरोना रुग्णाची रॅपीड अॅन्टीबॉडी ब्लड टेस्ट घेण्यात येणार आहे.
संवेदनशील भागासाठी नवी रणनिती
कोरोनाचा वेगाने प्रसार होणारे काही संवेदनशील भाग (हॉट्सस्पॉट) आम्ही शोधून काढले आहे. या भागांमध्ये कोरोना वेगाने पसरत आहे, की नाही हे रॅपीड अॅन्टीबॉडी चाचणीने स्पष्ट होणार आहे. या चाचणीचा निकालही तत्काळ मिळतो. जर या चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला तर त्या व्यक्तीला 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. तसेच त्यापुढील आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात यावी, असे आयसीएमआरचे डॉ. गंगा खेडकर यांनी सांगितले.