नवी दिल्ली - भारतामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 69 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 156 जण पूर्णत: बरे झाले आहेत. सर्वात जास्त रुग्ण केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. दिल्लीतील तबलीग जमात धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या 400 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतात आढळून आलेल्या एकून कोरोनाग्रस्तांपैकी 1860 अॅक्टिव केसेस आहेत. महाराष्ट्रामध्ये 416 रुग्णसंख्या झाली आहे. तर केरळमध्ये 265, तामिळनाडूत 234 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. भारतात मागील 24 तासांत 235 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तबलीग जमात धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या 960 परदेशी नागरिकांना भारत सरकारने काळ्या यादीत टाकले आहे.
विविध राज्यातील परिस्थिती
- कर्नाटक राज्यात मागील 24 तासांता 14 कोरोनाग्रस्त आढळून आले असून राज्यातील रुग्णांचा आकडा 124 वर पोहचला.
- तेलंगणा राज्यात आज 27 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 154 वर पोहचला आहे.
- मध्यप्रदेशात 107 कोरोनाग्रस्त 8 जणांचा मृत्यू
- दिल्लीत मागील 24 तासात 141 कोरोनाग्रस्त आढळले. एकून 293 रुग्ण
- महाराष्ट्रा्त दिवसभरात 81 रुग्ण आढळून आले असून एकून रुग्ण संख्या 416 वर गेली आहे.
- राजस्थानात 108 कोरोनाग्रस्त
- उत्तरप्रदेश 113 कोरोनाग्रस्त
- आंध्रप्रदेश 143 रुग्ण, आज दिवसभरात 11 नवे रुग्ण
- केरळमध्ये आज 21 नवे रुग्ण आढळले...एकून रुग्ण 265
- बिहारमध्ये 5 नवे कोरोनाचे रुग्ण, एकून रुग्ण 29