दामोह - मध्यप्रदेशातील एक आठ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्याची घटना घडली आहे. ही मुलगी शनिवारपासून घरातून बेपत्ता झाली होती. आपल्या मुलीचा खून झाल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला आहे. म्हणून संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे.
आपली आठ वर्षांची मुलगी शनिवारपासून घरातून गायब झाली होती. काही काळानंतर तिचा मृतदेह सरकारी विहिरीत सापडल्याची माहिती तिच्या आईने दिली. या मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीशी त्यांचे भांडण झाले होते. आपल्या कुटूंबास तो इथे जीवंत राहू देणार नाही, अशी धमकीही त्याने दिली होती.
काही दिवसांआधी एका व्यक्तीसोबत भांडण झाले होते. आणि तिच व्यक्ती या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. अशी माहिती, पोलीस अधीक्षक विवेक सिंग माध्यमांसोबत बोलताना दिली.
त्या व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. चौकशीत दोषी आढळल्या नंतरच आम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करू, असेही विवेक सिंग म्हणाले आहेत.