ETV Bharat / bharat

'ते' लोक अजूनही आहेत बेपत्ता..!

author img

By

Published : Dec 10, 2019, 6:27 PM IST

२०१८ पासून, मुलींच्या आई-वडिलांच्या तक्रारींवरून पोलीस अपहरणाचे गुन्हे दाखल करत आहेत. गेल्या दोन वर्षांत, १९ अपहरणाची प्रकरणे सोडवण्यात आली असून त्यापैकी फक्त तीन प्रकरणांमध्ये काहीही प्रगती झालेली नाही. दुंडीगल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक शेखर रेड्डी यांनी सांगितले, की तक्रार दाखल झाल्यानंतर एक वर्षांनंतर बेपत्ता व्यक्तीचा तपास लागला नाही तर आम्ही प्रकरण बंद करून टाकतो.

Missing cases in Hyderabad
'ते' लोक अजूनही आहेत बेपत्ता..!

एक कुटुंब उपजीविकेच्या शोधात शहरात आले. फावल्या वेळेत, १६ वर्षाची मुलगी आपल्या आईला चहाची टपरीचा व्यवसाय चालवण्यास सहाय्य करत असे. एका रात्रीतून मुलगी अचानक आईबरोबर बाहेर निघाली असताना गायब झाली. तिचा शोध घेण्यास असमर्थ ठरलेल्या, कुटुंबीयांनी गच्चीबोवली पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता तक्रार केली. आपली मुलगी सापडेल, या आशेने घरी गेलेल्या आईला आपल्याला भयंकर बातमी ऐकायला मिळणार आहे, याची काहीच कल्पना नव्हती. पोलिसांनी तिला सांगितले, की त्यांना एका निर्मनुष्य भागात एक मृतदेह सापडला आहे. अनेक जखमा झालेला आपल्या मुलीचा निष्प्राण देह पडलेला पाहून आई कोसळलीच..

काही दिवसांपूर्वी, शमशाबादमध्ये, एक तरूण डॉक्टर मुलगी 'दिशा'वर भयानक रितीने बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. त्या दुर्दैवी रात्री ९ वाजता, आपण कोणत्या परिस्थितीत सापडलो आहोत, हे कळवण्यासाठी तिने आपल्या बहिणीला कॉल केला होता. गुन्हेगार तिचा पाठलाग करत असल्याने ती भेदरली होती. काही मिनिटांतच तिचा फोन बंद झाला. चिंताग्रस्त झालेल्या आई-वडिलांनी तक्रार नोंदवण्यासाठी दोन पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे, दिशाचा मृतदेह, जाळून छिन्नभिन्न अवस्थेत सापडला. परिस्थितीचे गांभीर्य दिसत असूनही पोलिसांनी जी ढिलाई दाखवली, त्यामुळे समाजातील सर्वच स्तरांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

शहराच्या हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात हरवलेल्या लोकांची छायाचित्रे असलेला फलक असतो. काही ठाण्यांमध्ये, हरवलेल्या कुटुंबातील सदस्यांचा तपास लावण्यासाठी बक्षीसे जाहीर केली जातात. हैदराबादसारख्या मोठ्या शहरात, अनेक लोक दररोज आपली घरे सोडून निघून जातात. काही जण कौटुंबिक वादातून तर काही वैयक्तिक दबावामुळे हरवले जातात. हैदराबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात ११ अल्पवयीन आणि १४ महिलांसह ४० जण बेपत्ता झाले आहेत. पोलीस तपास चालू आहे, असे सांगून दिलासा देत असले तरीही, त्यांच्यापैकी एकाचाही ठावठिकाणा लागलेला नाही. एका घटनेत, ज्युबली हिल्स पोलीस ठाण्यात एका महिलेने आपल्या विभक्त झालेल्या पतीने आपल्या दोन लहान मुलांना चेन्नईला घेऊन गेल्याची तक्रार नोंदवली होती. जे कधीच सापडलेले नाहीत. दुसऱ्या एका घटनेत, एक एक विवाहित महिला आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली. मुलीच्या गायब होण्याची तक्रार तिच्या वडिलांनी नोंदवली आहे. अनेक महिने उलटून गेले तरीही, यापैकी कोणत्याही प्रकरणांमध्ये काहीही प्रगती झालेली नाही.

यावर्षी १ जून ते १० जून, या काळात ५४० लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्यापैकी, ३०३ हैदराबाद, सायबराबाद आणि रचाकोंडा हद्दीतील होते. २७६ महिला, ५५ मुली, २६ मुले आणि १८३ पुरूष बेपत्ता झाले असून त्यांपैकी २२२ जणांचा शोध लागला आहे. एकट्या नोव्हेंबरमध्येच, या तिन्ही पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत ३८ ते ४० जण हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. सरासरी, राज्यात दररोज ६० लोक बेपत्ता होतात आणि त्यांपैकी बहुतेक जण हे बृह्नहैदराबाद क्षेत्रातील आहेत.

या सर्वांचे अखेरीस काय होते? सीरियल किलरकडून ते ठार मारले जातात का? आपल्या पौगंडावस्थेतील मुली सुरक्षित आणि जिवंत परत येईपर्यंत आई-वडिलांना जराही मानसिक शांतता नसते. हरवलेल्यांपैकी केवळ ५० टक्के महिला आणि मुली सापडल्या आहेत. उरलेल्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या महिला आणि विवाहिता गायब होण्याच्या घटना पोलीस अपहरण म्हणून नोंदवत आहेत.

२४ जूनपासून बेपत्ता झालेल्या आपल्या मनोरूग्ण भावाचा शोध रामन्ना हा केपीएचबीचा रहिवासी घेत आहे. त्याच भागात रखवालदार म्हणून काम करणारा दुग्गी बालास्वामीने आपला १७ वर्षांचा मुका मुलगा राकेश २३ सप्टेंबरला बेपत्ता झाल्याचाी तक्रार नोंदवली. आपल्या सर्वात जवळच्या पोलीस ठाण्यात त्याने अनेकदा फेऱ्या मारल्या, पण त्याच्या मुलाचा काहीही सुगावा लागलेला नाही. केपीएचबी ४ केसचा रहिवासी व्ही. एस. राजू यांनी सांगितले की, त्यांचे ७८ वर्षांचे मनोरूग्ण वडील २१ जूनपासून बेपत्ता आहेता आणि तेव्हापासून त्यांच्याबाबत काहीही बातमी समजलेली नाही. इंदिरानगर येथे राहणाऱ्या आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या ४० वर्षांच्या महिला गीताने २०१७ च्या मे महिन्यात घर सोडले आणि ती कधीच परत आली नाही. तिची आई जयम्माने बालानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, मात्र तिच्या मुलीचा आजपर्यंत शोध लावता आलेला नाही. राजू कॉलनीतील रहिवासी, ३६ वर्षीय संजीवा राव, तीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला आहे. त्याची पत्नी करूणाश्रीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली, पण काहीही उपयोग झाला नाही.

लालगुडा पोलिसांनी अशी प्रकरणे सोडवण्याच्या दृष्टीने एक उदाहरण घालून दिले आहे. कोणत्याही माहितीशिवाय जे गायब झाले आहेत, त्यांना शोधण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. लालापेट, शांतीनगर, चंद्राबाबू नगर, सत्यनगर, इंदिरानगर, लालगुडा आणि मेट्टुगुडा यांच्या हद्दी त्यांनी तीन विभागांमध्ये वाटल्या आणि अनपेक्षित घटनांवर सातत्याने लक्ष ठेवले. २०१६-१९ या काळात, ६९ बेपत्ता प्रकरणांपैकी केवळ एक सोडवायचे राहिले. ६८ बेपत्ता महिलांचा त्यांनी शोध लावला आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी आणून पोहोचवले.

केपीएचबी कॉलनीत, स्वेचेछेने घर सोडणाऱ्या महिलांच्या प्रकरणांची संख्या वाढत आहे. काही महिला त्यांची घरे सोडताना त्यांच्या निर्णयाची माहिती स्वलिखित पत्रातून देत आहेत. तरूण डॉक्टरच्या भयानक खुनानंतर, हरवलेल्या महिलांचे आई-वडील आपल्या मुलींच्या ठावठिकाण्याबाबत अधिकच चिंतित झाले आहेत. केपीएचबी पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये नोंदवण्यात आलेल्या १९१ बेपत्ता प्रकरणांपैकी, १८० व्यक्ती सुरक्षितपणे घरी परत आल्या आहेत. केपीएचबीचे आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी सर्व बेपत्ता प्रकरणांचा तपास आम्ही लावणार आहोत, असे आश्वासन दिले आहे. बहुतेक बेपत्ता प्रकरणांमध्ये तरूण मुली एकदा १८ या कायदेशीर वयात गेल्या की आपल्या प्रियकरांबरोबर पळून गेल्याचे दिसले आहे. त्यापैकी काही विवाहानंतर घरी परत आल्या तर काहींनी पोलिसांशी संपर्क साधून आपल्या मित्राने फसवल्याची तक्रार केली. विवाह करण्यासाठी ज्यांनी प्रियकराबरोबर पळून गेल्या, त्यांच्यासाठी पोलिसांनी समुपदेशन सत्र सुरू केली आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून असलेल्या कोणत्याही धोक्याबाबत, पोलीस तरूण जोडप्यांना संरक्षण देत आहेत. ज्या प्रकरणांमध्ये मुलींना प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी फूस लावून फसवण्यात आले, त्या प्रकरणांत गुन्हे नोंदवण्यात येऊन आरोपींना कोठडीत पाठवण्यात आले आहे.

हयातनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या बेपत्ता प्रकरणांमध्ये, बहुतेक सारी प्रकरणे ही वृद्धाश्रम आणि अनाथालयांमधील आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ऐकू येत नसल्याने आणि स्मरणशक्ती हरवल्याने शोधणे अवघड होत चालले आहे. हयातनगर पोलिसांनी रेल्वे स्थानके आणि बस थांब्यांवर भीक मागताना आढळलेल्या मुलांना कल्याण केंद्रांमध्ये हलवण्यास सुरूवात केली आहे. त्यापैकी बहुतेक जण हे काही दिवसांनंतर पुन्हा ही घरे सोडत आहेत. मलकागिरी पोलीस ठाण्यात, १३४ बेपत्ता प्रकरणांची नोंद आजपर्यंत झाली आहे. १३४ गायब झालेल्या लोकांपैकी, २० टक्के या तरूण महिला आहेत, यामधील ९५ टक्के आपल्या घरी सुरक्षित पोहचल्या आहेत. बालानगर पोलीस ठाण्यात,२०१४ पासून ३०३ बेपत्ता प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी २८६ प्रकरणे सोडवली गेली आहेत. उरलेल्या १७ प्रकरणांमध्ये काहीच प्रगती झालेली नाही. पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या ४० ते ७० टक्के प्रकरणे ही बेपत्ता झालेल्या व्यक्तींची प्रकरणे आहेत. बालानगरचे आयुक्त वहिदुद्दीन, यांनी सांगितले की, नाहीसे होण्यामागील कारणांचे आम्ही विश्लेषण करतो आणि त्यानुसार प्रकरणे सोडवण्याच्या मागे लागतो.

ज्युबली हिल्समध्ये, गेल्या चार वर्षांत हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणांची यशस्वीपणे सोडवणूक केली आहे. ५४६ बेपत्ता प्रकरणे गेल्या चार वर्षांत नोंदवण्यात आली असून केवळ २० प्रकरणे अद्याप सुटलेली नाहीत. ज्युबिली हिल्सचे आयुक्त पी. बालवंतिय्या यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि हरवलेल्या व्यक्तींच्या ओळखींच्या व्यक्तीचा तपास करून आम्ही प्रकरणे निकाली काढत आहोत. बंजारा हिल्समध्ये बेपत्ता प्रकरणांची संख्या वाढत आहे. गेल्या चार वर्षांत, ७३५ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. संबंधित पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, तांत्रिक प्रगतीचा उपयोग करून आम्ही ९० टक्के प्रकरणांची सोडवणूक केली आहे. बाचुपल्ली पोलिस ठाण्यात, गेल्या दोन वर्षांत १९४ बेपत्ता प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. २०१८ मध्ये ९६ लोक बेपत्ता झाले असून त्यापैकी ५१ महिला तर १२ मुली होत्या. २०१९ मध्ये ५४ पुरूष, ३९ महिला, ४ मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाली. या ९८ बेपत्ता प्रकरणांपैकी, ८१ जणांचा पत्ता लावण्यात पोलिसांना यश आले.

कुतबुल्लापूर मंडलच्या दुंडीगल पोलीस ठाण्यात, गेल्या चार वर्षांत ५७६ बेपत्ता प्रकरणे नोंदवण्यात आली. यापैकी, ७८ प्रकरणे अद्यापही सोडवायची बाकी आहेत. २०१८ पासून, मुलींच्या आईवडलांच्या तक्रारींवरून पोलीस अपहरणाचे गुन्हे दाखल करत आहेत. गेल्या दोन वर्षांत, १९ अपहरणाची प्रकरणे सोडवण्यात आली असून त्यापैकी फक्त तीन प्रकरणांमध्ये काहीही प्रगती झालेली नाही. दुंडीगल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक शेखर रेड्डी यांनी सांगितले, की तक्रार दाखल झाल्यानंतर एक वर्षांनंतर बेपत्ता व्यक्तीचा तपास लागला नाही तर आम्ही प्रकरण बंद करून टाकतो. आता स्थिती बदलली असून पौगंडावस्थेतील बेपत्ता मुलींच्या आई-वडिलांकडून तक्रारी आल्यानंतर आम्ही सरळ अपहरणाची प्रकरणे नोंद करत आहोत. ४५ वर्षीय गृहरक्षक दलाचा जवान महंमद इब्राहिम, १३ फेब्रुवारी २०१६ला आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून मेदाराम येथे गेला असताना बेपत्ता झाला आहे. तीन वर्षांनंतरही त्याबाबत काहीही बातमी नाही. त्याची पत्नी सलीमा बेगमने चंद्रायन गुट्टा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तिने म्हटले आहे की, २० फेब्रुवारी, २०१६ला तिच्या पतीने आपला ठावठिकाणा कळवला होता. त्याच्या शेवटच्या फोननंतर तो अचानक गायब झाला. चंद्रायन गुट्टा पोलिसांनी वारंगळ पोलिसांच्या समन्वयाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही उपयोग झाला नाही..

हेही वाचा : लैंगिक अत्याचार कसे रोखाल...हे आहेत डावपेच

Intro:Body:

'ते' लोक अजूनही आहेत बेपत्ता..!

एक कुटुंब उपजीविकेच्या शोधात शहरात आले. फावल्या वेळेत, १६ वर्षाची मुलगी आपल्या आईला चहाची टपरीचा व्यवसाय चालवण्यास सहाय्य करत असे. एका रात्रीतून मुलगी अचानक आईबरोबर बाहेर निघाली असताना गायब झाली. तिचा शोध घेण्यास असमर्थ ठरलेल्या, कुटुंबीयांनी गच्चीबोवली पोलिस ठाण्यात रात्री ११ वाजता तक्रार केली. आपली मुलगी सापडेल, या आशेने घरी गेलेल्या आईला आपल्याला भयंकर बातमी ऐकायला मिळणार आहे, याची काहीच कल्पना नव्हती. पोलिसांनी तिला सांगितले की, त्यांना एका निर्मनुष्य भागात एक मृतदेह सापडला आहे. अनेक जखमा झालेला आपल्या मुलीचा निष्प्राण देह पडलेला पाहून आई कोसळलीच..

काही दिवसांपूर्वी, शमशाबादमध्ये, एक तरूण डॉक्टर मुलगी 'दिशा'वर भयानक रितीने बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. त्या दुर्दैवी रात्री ९ वाजता, आपण कोणत्या परिस्थितीत सापडलो आहोत, हे कळवण्यासाठी तिने आपल्या बहिणीला कॉल केला होता. गुन्हेगार तिचा पाठलाग करत असल्याने ती भेदरली होती. काही मिनिटांतच तिचा फोन बंद झाला. चिंताग्रस्त झालेल्या आईवडलांनी तक्रार नोंदवण्यासाठी दोन पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे, दिशाचा मृतदेह, जाळून छिन्नभिन्न अवस्थेत सापडला. परिस्थितीचे गांभीर्य दिसत असूनही पोलिसांनी जी ढिलाई दाखवली, त्यामुळे समाजातील सर्वच स्तरांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

शहराच्या हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्यात हरवलेल्या लोकांची छायाचित्रे असलेला फलक असतो. काही ठाण्यांमध्ये, हरवलेल्या कुटुंबातील सदस्यांचा तपास लावण्यासाठी बक्षीसे जाहीर केली जातात. हैदराबादसारख्या मोठ्या शहरात, अनेक लोक दररोज आपली घरे सोडून निघून जातात. काही जण कौटुंबिक वादातून तर काही वैयक्तिक दबावामुळे हरवले जातात. हैदराबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात ११ अल्पवयीन आणि १४ महिलांसह ४० जण बेपत्ता झाले आहेत. पोलीस तपास चालू आहे, असे सांगून दिलासा देत असले तरीही, त्यांच्यापैकी एकाचाही ठावठिकाणा लागलेला नाही. एका घटनेत, ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात एका महिलेने आपल्या विभक्त झालेल्या पतीने आपल्या दोन लहान मुलांना चेन्नईला घेऊन गेल्याची तक्रार नोंदवली होती. जे कधीच सापडलेले नाहीत. दुसऱ्या एका घटनेत, एक एक विवाहित महिला आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली. मुलीच्या गायब होण्याची तक्रार तिच्या वडिलांनी नोंदवली आहे. अनेक महिने उलटून गेले तरीही, यापैकी कोणत्याही प्रकरणांमध्ये काहीही प्रगती झालेली नाही.

यावर्षी १ जून ते १० जून, या काळात ५४० लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्यापैकी, ३०३ हैदराबाद, सायबराबाद आणि राचाकोंडा हद्दीतील होते. २७६ महिला, ५५ मुली, २६ मुले आणि १८३ पुरूष बेपत्ता झाले असून त्यांपैकी २२२ जणांचा शोध लागला आहे. एकट्या नोव्हेंबरमध्येच, या तिन्ही पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीत ३८ ते ४० जण हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. सरासरी, राज्यात दररोज ६० लोक बेपत्ता होतात आणि त्यांपैकी बहुतेक जण हे बृह्नहैदराबाद क्षेत्रातील आहेत.

या सर्वांचे अखेरीस काय होते? सीरियल किलरकडून ते ठार मारले जातात का? आपल्या पौगंडावस्थेतील मुली सुरक्षित आणि जिवंत परत येईपर्यंत आईवडलांना जराही मानसिक शांतता नसते. हरवलेल्यांपैकी केवळ ५० टक्के महिला आणि मुली सापडल्या आहेत. उरलेल्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या महिला आणि विवाहिता गायब होण्याच्या घटना पोलिस अपहरण म्हणून नोंदवत आहेत.

२४ जूनपासून बेपत्ता झालेल्या आपल्या मनोरूग्ण भावाचा शोध रामन्ना हा केपीएचबीचा रहिवासी घेत आहे. त्याच भागात रखवालदार म्हणून काम करणारा दुग्गी बालास्वामीने आपला १७ वर्षांचा मुका मुलगा राकेश २३ सप्टेंबरला बेपत्ता झाल्याचाी तक्रार नोंदवली. आपल्या सर्वात जवळच्या पोलिस ठाण्यात त्याने अनेकदा फेऱ्या मारल्या, पण त्याच्या मुलाचा काहीही सुगावा लागलेला नाही. केपीएचबी ४ केसचा रहिवासी व्ही. एस. राजू यांनी सांगितले की, त्यांचे ७८ वर्षांचे मनोरूग्ण वडील २१ जूनपासून बेपत्ता आहेता आणि तेव्हापासून त्यांच्याबाबत काहीही बातमी समजलेली नाही. इंदिरानगर येथे राहणाऱ्या आणि  रोजंदारीवर काम करणाऱ्या ४० वर्षांच्या महिला गीताने २०१७ च्या मे महिन्यात घर सोडले आणि ती कधीच परत आली नाही. तिची आई जयम्माने बालानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, मात्र तिच्या मुलीचा आजपर्यंत शोध लावता आलेला नाही. राजू कॉलनीतील रहिवासी, ३६ वर्षीय संजीवा राव, तीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला आहे. त्याची पत्नी करूणाश्रीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली, पण काहीही उपयोग झाला नाही.

लालगुडा पोलिसांनी अशी प्रकरणे सोडवण्याच्या दृष्टीने एक उदाहरण घालून दिले आहे. कोणत्याही माहितीशिवाय जे गायब झाले आहेत, त्यांना शोधण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. लालापेट, शांतीनगर, चंद्राबाबू नगर, सत्यनगर, इंदिरानगर, लालगुडा आणि मेट्टुगुडा यांच्या हद्दी त्यांनी तीन विभागांमध्ये वाटल्या आणि अनपेक्षित घटनांवर सातत्याने लक्ष ठेवले. २०१६-१९ या काळात, ६९ बेपत्ता प्रकरणांपैकी केवळ एक सोडवायचे राहिले. ६८ बेपत्ता महिलांचा त्यांनी शोध लावला आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी आणून पोहचवले.

केपीएचबी कॉलनीत, स्वेचेछेने घर सोडणाऱ्या महिलांच्या प्रकरणांची संख्या वाढत आहे. काही महिला त्यांची घरे सोडताना त्यांच्या निर्णयाची माहिती स्वलिखित पत्रातून देत आहेत. तरूण डॉक्टरच्या भयानक खुनानंतर, हरवलेल्या महिलांचे आईवडील आपल्या मुलींच्या ठावठिकाण्याबाबत अधिकच चिंतित झाले आहेत. केपीएचबी पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये नोंदवण्यात आलेल्या १९१ बेपत्ता प्रकरणांपैकी, १८० व्यक्ती सुरक्षितपणे घरी परत आल्या आहेत. केपीएचबीचे आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी सर्व बेपत्ता प्रकरणांचा तपास आम्ही लावणार आहोत, असे आश्वासन दिले आहे. बहुतेक बेपत्ता प्रकरणांमध्ये तरूण मुली एकदा १८ या कायदेशीर वयात गेल्या की आपल्या प्रियकरांबरोबर पळून गेल्याचे दिसले आहे. त्यापैकी काही विवाहानंतर घरी परत आल्या तर काहींनी पोलिसांशी संपर्क साधून आपल्या मित्राने फसवल्याची तक्रार केली. विवाह करण्यासाठी ज्यांनी प्रियकराबरोबर पळून गेल्या, त्यांच्यासाठी पोलिसांनी समुपदेशन सत्र सुरू केली आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून असलेल्या कोणत्याही धोक्याबाबत, पोलिस तरूण जोडप्यांना संरक्षण देत आहेत. ज्या प्रकरणांमध्ये मुलींना प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी फूस लावून फसवण्यात आले, त्या प्रकरणांत गुन्हे नोंदवण्यात येऊन आरोपींना कोठडीत पाठवण्यात आले आहे.

हयातनगर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या बेपत्ता प्रकरणांमध्ये, बहुतेक सारी प्रकरणे ही वृद्धाश्रम आणि अनाथालयांमधील आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ऐकू येत नसल्याने आणि स्मरणशक्ती हरवल्याने शोधणे अवघड होत चालले आहे. हयातनगर पोलिसांनी रेल्वे स्थानके आणि बस थांब्यांवर भीक मागताना आढळलेल्या मुलांना कल्याण केंद्रांमध्ये हलवण्यास सुरूवात केली आहे. त्यापैकी बहुतेक जण हे काही दिवसांनंतर पुन्हा ही घरे सोडत आहेत. मलकाजगिरी पोलिस ठाण्यात, १३४ बेपत्ता प्रकरणांची नोंद आजपर्यंत झाली आहे. १३४ गायब झालेल्या लोकांपैकी, २० टक्के या तरूण महिला आहेत, यामधील ९५ टक्के आपल्या घरी सुरक्षित पोहचल्या आहेत. बालानगर पोलिस ठाण्यात,२०१४ पासून ३०३ बेपत्ता प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी २८६ प्रकरणे सोडवली गेली आहेत. उरलेल्या १७ प्रकरणांमध्ये काहीच प्रगती झालेली नाही. पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या ४० ते ७० टक्के प्रकरणे ही बेपत्ता झालेल्या व्यक्तींची प्रकरणे आहेत. बालानगरजे आयुक्त वहिदुद्दीन, यांनी सांगितले की, नाहीसे होण्यामागील कारणांचे आम्ही विश्लेषण करतो आणि त्यानुसार प्रकरणे सोडवण्याच्या मागे लागतो.

ज्युबली हिल्समध्ये, गेल्या चार वर्षांत हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणांची यशस्वीपणे सोडवणूक केली आहे. ५४६ बेपत्ता प्रकरणे गेल्या चार वर्षांत नोंदवण्यात आली असून केवळ २० प्रकरणे अद्याप सुटलेली नाहीत. ज्युबिली हिल्सचे आयुक्त पी. बालवंतिय्या यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि हरवलेल्या व्यक्तींच्या ओळखींच्या व्यक्तीचा तपास करून आम्ही प्रकरणे निकाली काढत आहोत. बंजारा हिल्समध्ये बेपत्ता प्रकरणांची संख्या वाढत आहे. गेल्या चार वर्षांत, ७३५ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. संबंधित पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, तांत्रिक प्रगतीचा उपयोग करून आम्ही ९० टक्के प्रकरणांची सोडवणूक केली आहे. बाचुपल्ली पोलिस ठाण्यात, गेल्या दोन वर्षांत १९४ बेपत्ता प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. २०१८ मध्ये ९६ लोक बेपत्ता झाले असून त्यापैकी ५१ महिला तर १२ मुली होत्या. २०१९ मध्ये ५४ पुरूष, ३९ महिला, ४ मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाली. या ९८ बेपत्ता प्रकरणांपैकी, ८१ जणांचा पत्ता लावण्यात पोलिसांना यश आले.

कुतबुल्लापूर मंडलच्या दुंडीगल पोलिस ठाण्यात, गेल्या चार वर्षांत ५७६ बेपत्ता प्रकरणे नोंदवण्यात आली. यापैकी, ७८ प्रकरणे अद्यापही सोडवायची बाकी आहेत. २०१८ पासून, मुलींच्या आईवडलांच्या तक्रारींवरून पोलिस अपहरणाचे गुन्हे दाखल करत आहेत. गेल्या दोन वर्षांत, १९ अपहरणाची प्रकरणे सोडवण्यात आली असून त्यापैकी फक्त तीन प्रकरणांमध्ये काहीही प्रगती झालेली नाही. दुंडीगल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक शेखर रेड्डी यांनी सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर एक वर्षांनंतर बेपत्ता व्यक्तीचा तपास लागला नाही तर आम्ही प्रकरण बंद करून टाकतो. आता स्थिती बदलली असून पौगंडावस्थेतील बेपत्ता मुलींच्या आईवडलांकडून तक्रारी आल्यानंतर आम्ही सरळ अपहरणाची प्रकरणे नोंद करत आहोत. ४५ वर्षीय गृहरक्षक दलाचा जवान महंमद इब्राहिम, १३ फेब्रुवारी २०१६ रोजी आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून मेदाराम येथे गेला असताना बेपत्ता झाला आहे. तीन वर्षांनंतरही त्याबाबत काहीही बातमी नाही. त्याची पत्नी सलीमा बेगमने चंद्रायन गुट्टा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तिने म्हटले आहे की, २० फेब्रुवारी, २०१६ रोजी तिच्या पतीने आपला ठावठिकाणा कळवला होता. त्याच्या शेवटच्या फोननंतर तो अचानक गायब झाला. चंद्रायन गुट्टा पोलिसांनी वारंगळ पोलिसांच्या समन्वयाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही उपयोग झाला नाही..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.