नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. दक्षिण दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये काल(बुधवारी) ही घटना घडली. आरोपीसुद्धा क्वारंटाइन सेंटरमध्ये राहत होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परविंदर सिंग यांनी सांगितले. घटनेनंतर पीडित तरुणीला केंद्र सरकाच्या अखत्यारितील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. मात्र, त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर अटक करण्यात येईल, असे दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरुण गुप्ता म्हणाले.