श्रीनगर - जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केला. गुलाम कादीर असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. गंदेरबाल जिल्ह्यातील नुनेर भागात ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून हल्ला उधळून लावला. पोलिसांच्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला आहे.
गुलाम कादीर या भाजप कार्यकर्त्याच्या घरावर मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई केली. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आहे. आज सायंकाळी संशयित दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केला. मात्र, हा हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला. या हल्ल्यातून भाजप कार्यकर्ता बचावला आहे, असे पोलिसांनी सांगितले. कारवाईत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गोळीबात एक दहशतवादी ठार झाला आहे. तर पोलीस शिपाई मोहम्मद अल्ताफ जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मोहम्मद अल्ताफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजत आहे. कारवाईनंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून इतर दहशतवाद्यांचा शोध सरू आहे.