ETV Bharat / bharat

मजुरांची पोलिसांवर दगडफेक... गुजरातच्या दोहोडमधील प्रकार - गुजरात बातमी

उत्तर प्रदेशातील हे मजूर असून लाॅकडाऊनमुळे येथे अडकले आहेत. प्रशासन आणि पोलिसांनी या मजुरांना घरी पाठवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासाठी काही अवधी लागत होता. उत्तर प्रदेश सरकारची यासाठी मंजुरी येणे बाकी होते. त्यातच त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली,

मजुरांची पोलिसांवर दगडफेक...
मजुरांची पोलिसांवर दगडफेक...
author img

By

Published : May 3, 2020, 12:13 PM IST

गांधीनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन आणखी दोन आठवडे केंद्र सरकारने वाढवले आहे. लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांचा धीर सुटत आहे. त्यामुळे ते जीवाची पर्वा न करता घरी जाण्याचा पर्यंत्न करीत आहेत. अशाच प्रकारे घरी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. गुजरातमधील दोहोड जिल्ह्यातील खंगेलात ही घटना घडली. या घटनेत पोलिसांना इजा झाली नाही. मात्र, पोलिसांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा- बोरिस जॉन्सन अन् कॅरी सायमंड्स यांनी आपल्या मुलाचे 'हे' ठेवले नाव

घटनेनंतर पत्रकारांशी बोलतांना दोहोडचे पोलीस अधीक्षक म्हणाले की, काही मजुरांनी आमच्यावर दगडफेक केली. या घटनेत आमची काही वाहनांचे नुकसान झाले. पण यात कोणीही जखमी झाले नाही. घटनेतील 40 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील हे मजूर असून लाॅकडाऊनमुळे येथे अडकले आहेत. प्रशासन आणि पोलिसांनी या मजुरांना घरी पाठवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासाठी काही अवधी लागत होता. उत्तर प्रदेश सरकारची यासाठी मंजुरी येणे बाकी होते.

मात्र, तरीही मजुरांनी रस्त्यावर येत घरी जाण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली. लॉकडाऊन दरम्यान प्रशासन येथील नागरिकांची सेवा करत आहे. मात्र, असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे एसपी यांनी सांगितले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.