ETV Bharat / bharat

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च समितीची जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी घेतली भेट - JNU

यात शुल्कवाढ परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून पोलिसांच्या कथीत मारझोडीविरोधात निदर्शने करण्यात आली. निदर्शना दरम्यान पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

बैठक
author img

By

Published : Nov 21, 2019, 8:11 AM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे गेल्या वीस दिवसांपासून शुल्कवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर काल (बुधवार) मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च समितीची आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांची बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी उच्च समितीचे सदस्य विद्यार्थ्यांना शुक्रवारी विद्यापीठात भेटणार आहेत.

विद्यापीठाचे काम सुरळीत चालण्यास विद्यार्थ्यांनी मदत करावी, अशी विनंती समितीकडून करण्यात आली. याला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आश्चर्य म्हणजे या बैठकीला जेएनयूचे कुलगुरू अनुपस्थित होते. या बैठकीला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन व्ही.एस चव्हाण, युजीसीचे सचीव रजनीश जैन आदी उपस्थित होते.

जेएनयू विद्यार्थी संसदेने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहले. यात काही मागण्या केल्या आहेत. यात शुल्कवाढ परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून पोलिसांच्या कथित मारझोडीविरोधात निदर्शने करण्यात आली. निदर्शना दरम्यान पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

Intro:Body:

देगलूर तालुक्यातील बंद पडलेल्या वाळू घाटावरून दररोज रात्रीच्या सुमारास वाळूचा अवैध उपसा व चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगेे यांना समजल्यानंतर ते मंगळवार 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.