ETV Bharat / bharat

केरळच्या आरोग्य विभागातील वॉरियर्सचा सत्कार, सुपर नायक म्हणून केला गौरव - केरळचे आरोग्य विभागाचा सत्कार

कोच्ची येथे रविवारी सकाळी कोरोना संसर्गाशी लढणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आदी कोरोना वॉरियर्सचा सत्कार करण्यात आला. भारतीय संरक्षण दलातर्फे या वॉरियर्सना सुपर नायक म्हणून गौरवण्यात आले. तसेच, अरबी समुद्रावर हेलिकॉप्टर, विमान आणि वेगवान इंटरसेप्टर स्टीम पास्ट करून त्यांना मानवंदना देण्यात देली. हा दिवस केरळच्या आरोग्य विभागासाठी अविस्मरणीय दिवस ठरला.

केरळच्या आरोग्य विभागातील वॉरियर्सचा सत्कार

author img

By

Published : May 3, 2020, 2:26 PM IST

तिरुवनंतपुरम - कोच्ची येथे रविवारी सकाळी कोरोना संसर्गाशी लढणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आदी कोरोना वॉरियर्सचा सत्कार करण्यात आला. भारतीय संरक्षण दलातर्फे या वॉरियर्सना सुपर नायक म्हणून गौरवण्यात आले. तसेच, अरबी समुद्रावर हेलिकॉप्टर, विमान आणि वेगवान इंटरसेप्टर स्टीम पास्ट करून त्यांना मानवंदना देण्यात देली. हा दिवस केरळच्या आरोग्य विभागासाठी अविस्मरणीय दिवस ठरला. तिरुअनंतपुरम साधारण रुग्णालयाच्या (टीजीएच) पॅरामेडीकल स्टाफने 'आम्हाला देण्यात आलेला हा सन्मान हा अविस्मरणीय आहे. हा अनुभव आम्ही कधीही विसरणार नाही. या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

'आम्हाला खरोखरच आनंद होत आहे की, आमच्या परिश्रमांसाठी आमचा सन्मान झाला आहे. यामुळे आमच्या अधिक कठोर परिश्रम करण्याचे मनोबल वाढेल,' असे एका परिचारिकेने सांगितले. सकाळी 10 वाजता संपूर्ण टीजीएच रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी स्टाफ उड्डाणपुलासाठी रुग्णालयासमोर थांबले होते. दरम्यान, सारंग हेलिकॉप्टर आले आणि त्यातून तीन वेळा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी टीजीएच समोरील रस्त्यावर 108 रुग्णवाहिकादेखील रांगेत लावण्यात आल्या होत्या. यावेळी आकाशात हेलिकॉप्टर दिसताच स्टाफने हात उंचावून आणि टाळ्या वाजवल्या.

हेलिकॉप्टर अदृश्य झाल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी फुलं आणि पाकळ्या गोळा केल्या. हा क्षण सर्वांसाठी खुप भावनिक आणि आनंदाचा होता. तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील सफाई कामगारांपासून ते वरिष्ठ डॉक्टरांपर्यंत संपूर्ण कर्मचारीवर्ग रुग्णालयासमोर उपस्थित होते. फुल पाकळ्यांच्या वर्षावानंतर हेलिकॉप्टर निघून गेल्यानंतर प्रत्येक कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर निघून गेले.

त्याचप्रमाणे कोची येथे दक्षिणी नौदल कमांडचे वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांनी एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलमधे येऊन आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचे स्वागत केले आणि आभार मानले. त्यांच्यासह शीर्ष नौदल अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यानंतर नौदलाच्या विमानातून या कर्मचाऱ्यांवर फुले व पाकळ्यांनी वर्षव करण्यात आला. कोची मरीन ड्राईव्हवरही आरोग्य कर्मचार्‍यांचे आभार मानण्यासाठी हवाई आणि पाण्याचे प्रदर्शन करून आरोग्य विभागाचे आभार माणण्यात आले. तसेच फ्लायपास्ट आणि डोर्नियर विमानाने तर, हेलीकॉप्टर जलवाहतूक करणाऱ्या बोटींवरून 'कोरोना वॉरियर्सना भारताचा सलाम'असे बॅनर झळकवण्यात आले. यासोबतच, पांगोडे आर्मी मिलिटरी कॅम्पशी संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य पोलीस मुख्यालयात, येऊन पोलीस दलाला अभिवादन केले. केक कापण्यात आला आणि मिठाई वाटल्या गेल्या. सैन्य दलानेदेखील पोलीस दलाच्या सन्मानाचे चिन्ह म्हणून बजावले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.