ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमावाद : आज कॉर्प कमांडर स्तरावर होणार बैठक; परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारीही असणार उपस्थित

author img

By

Published : Sep 21, 2020, 7:17 AM IST

लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी उपस्थित असण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र कोणताही अधिकारी उपस्थित असणार नाही. भारताकडून लष्कराचे प्रतिनिधित्व लेफ्टनंट जनरलर हरेंदर सिंग करणार आहेत. दोन्ही देशांनी आपापल्या सीमांवर सुमारे एक लाख जवान आणि शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. मात्र, हा वाद चर्चेतूनच सोडवावा यावरही दोन्ही देश भर देत आहेत.

MEA official to be in corps commander level talks at Moldo on Monday
भारत-चीन सीमावाद : आज कॉर्प कमांडर स्तरावर होणार बैठक; परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारीही असणार उपस्थित

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादाबाबत दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक आज पार पडणार आहे. दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान सुरू असलेल्या चर्चेची ही सहावी फेरी असणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील सह-सचिव स्तरावरील एक अधिकारीही उपस्थित असणार आहे. आज सकाळी ११ वाजेपासून, सीमा परिसरातील मोल्दो येथे ही बैठक सुरू होणार आहे.

लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी उपस्थित असण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र कोणताही अधिकारी उपस्थित असणार नाही. भारताकडून लष्कराचे प्रतिनिधित्व लेफ्टनंट जनरलर हरेंदर सिंग करणार आहेत. ते लेहमधील १४ कॉर्प्सचे कमांडर आहेत. तर, चीनकडून मेजर-जनरल लिन लिऊ उपस्थित असणार आहेत. ते चीनच्या साऊथ शिनजियँग मिलिट्री डिस्ट्रिक्टचे कमांडर आहेत.

दोन्ही देशांच्या सीमेवरील तणावामुळे सहा जूनपासून लष्करी बैठका घेण्यात येत आहेत. यापूर्वी मोल्दोमध्येच सहा जून, २२ जून, १४ जुलै आणि २ ऑगस्टला बैठका पार पडल्या आहेत. दरम्यान, दोन्ही देशांनी आपापल्या सीमांवर सुमारे एक लाख जवान आणि शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. मात्र, हा वाद चर्चेतूनच सोडवावा यावरही दोन्ही देश भर देत आहेत.

हेही वाचा : शस्त्र पुरवठ्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून ड्रोनचा वापर - बीएसएफ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.