ETV Bharat / bharat

मुंबई-दिल्लीसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये 'हाय अलर्ट'; दहशतवादी हल्ल्याची शक्यता - high alert in india

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई-दिल्लीसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये हायल अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शहरांमध्ये 'हाय अलर्ट'
author img

By

Published : Aug 10, 2019, 11:44 PM IST

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिन आणि बकरी ईदच्या दिवशी देशात दहशतवाद्यांकडून मोठा घातपात होण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. १२ ऑगस्टला (सोमवार) बकरी ईद आहे तर स्वातंत्र्य दिन बुधवारी (१५ ऑगस्ट) आहे. या दोन दिवशी घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई-दिल्लीसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये हायल अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तानमध्येही रोष व्यक्त केला होता.

नजीकच्या काळात दोन मोठे सण असून त्यादरम्यान दहशतवादी भारतात हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीरमध्ये आणि पूर्व भारतातील शहरांमध्ये दहशतवादी मोठा हल्ला करू शकतात, असा इशारा आयबीकडून देण्यात आला आहे. आयबीने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.