मेरठ (उत्तर प्रदेश) - लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्न खोळंबली आहेत. लग्नाची तारीख आधीच ठरल्यामुळे आणि लॉकडाऊन न उघडल्यामुळे नवरदेव मोजक्याच वऱ्हाडींसोबत वरात घेऊन येतोय. या काळात अनेक लग्न कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेताच होत आहे, असेच एक लग्न उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये पार पडले.
मेरठच्या दुल्हेडा चौहान गावात असेच एक लग्न पार पडले. रविवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवरदेव तीन वऱ्हाडींना सोबत घेऊन लग्नमंडपात पोहोचला. या लग्नात ना बँड बाजा होता ना कुठलाच डीजे. दोन्ही कुटुंबीयांनी लॉकडाऊनच्या आधी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न ठरवले होते. पहिले लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होते, त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांना वाटले की लग्न २६ एप्रिलला आहे. तर काहीच अडचण येणार नाही. मात्र, लॉकडाऊन पुन्हा ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. या दरम्यान दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाची पूर्ण तयारी केली होती.
लॉकडाऊन वाढला असला तरी लग्न ठरलेल्या तारखेलाच करण्याचे दोन्ही कुटुंबीयांनी नक्की केले. रविवारी जिल्ह्यातील दतावली गावात राहणारा लुक्स चौहान तीन वऱ्हाडींसोबत दुल्हैडा चौहान गावात पोहोचला. याठिकाणी विरेंद्र चौहान यांची मुलगी आंचलसोबत लुक्सचा विवाह हिंदू पद्धतीप्रमाणे पार पडला.
सोशल डिस्टंसिंग पाळले -
फेरे घेताना नवरदेव-नवरीनेदेखील सोशन डिस्टंसिंग पाळले. मुलीकडील उपस्थितांनी दोघांनाही आशीर्वाद देऊन विदा केले. या लग्नासाठी नवरदेवाकडील लोकांनी कुठल्याही प्रकारचा हुंडा घेतला नाही.