रांची(बोकारो) - कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या लॉकडाऊनचे पालन करने बोकारोमधील खेतको गावच्या एका व्यक्तीसाठी जीवघेणे ठरले. अलीमुद्धीन असे या व्यक्तीचे नाव आहे.
अलीमुद्धीन खेतको गावचा रहिवासी आहे. कोरोनापासून स्वत:च्या गावचे संरक्षण व्हावे यासाठी त्याने गावकऱ्यांच्या संमतीने गावात येणार रस्ता बंद केला होता. मात्र, काही लोक विटांनी भरलेला ट्रॅक्टर गावात आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी रस्ता अडवण्यासाठी लावलेला अडथळा बाजूला काढला. जेव्हा अलीमुद्धीनने त्यांना याबाबत विचारणा केली तेव्हा त्या लोकांनी त्याला जबर मारहाण करुन जवळच असलेल्या विहिरीत फेकून दिले.
काहीवेळातच गावकरी जमा झाले मात्र, मारेकरी पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी अलीमुद्धीनच्या मुलाने ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.