अजमेर (राजस्थान) - अजमेरच्या एका व्यक्तीने त्याच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चंद्रावर जागा विकत घेऊन पत्नीला भेट दिली आहे. धर्मेंद्र धमीजा असे या व्यक्तीचे नाव आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लूनर सोसाइटी इंटरनेशनलने ही जमीन त्यांच्या नावे केली आहे.
कार्यक्रमात पत्नीच्या स्वाधीन केले प्रमाणपत्र -
मुळच्या अजमेरच्या परंतु सद्या ब्राजीलमध्ये राहणाऱ्या धर्मेंद्र धमीजा यांनी पत्नी सपना धमीजाला लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त चंद्रावर 3 एकर जमीन भेट दिली आहे. तसेच जमीनीचे नोंदणी प्रमाणपत्र आणि चंद्रावरील नागरिकत्त्व एका कार्यक्रमात त्यांनी पत्नीच्या स्वाधीन केले. ही जमीन 14.3 उत्तर लटीट्यूड आणि 5.6 पुर्व लॉंगीट्यू़डवर आहे. ज्याचा पता ट्रैक्ट पार्सल संख्या 377, 378 और 379 चंद्र असा आहे. तर त्याचा फाईल नंबर 14253182f असा आहे.
उपस्थितांनी टाळ्या वाजवत केले अभिनंदन -
अजमेरच्या राशि इंटरनेशनल या कंपनीद्वारे 24 डिसेंबररोजी एक कार्यक्रमात केक कापल्यानंतर धर्मेंद्रने या जमीनीचे कागदपत्रे पत्नीला भेट दिली. यावेळी चंद्रासारखे वातावरणही बनवण्यात आले होते. चंद्रावरील जमीनीचे कागदपत्रे स्विकारताना उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सपना भावूक झाल्या होत्या. लूनर प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर त्यांना चंद्रावरील नागरिकताही मिळाली आहे. तसेच भविष्यात ते या जमिनीला विकूही शकतात. तसेच या जागेवर काही संशोधन झाल्यास त्याची रॉयलटीही त्यांनी मिळू शकते.
हेही वाचा - उत्तराखंड: वाघांचा गड असलेल्या कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये तस्करांची घुसखोरी