ETV Bharat / bharat

परदेशातून आलेल्या व्यक्तीचा बिहारच्या विलगीकरण केंद्रामध्ये मृत्यू..

सौदी अरेबियाच्या जेद्दाहमधून तीन जूनला विकी भारतात परतला होता. त्यानंतर त्याला बोधगयामधील विलगीकरण केंद्रामध्ये रुपांतरीत केलेल्या एका मठामध्ये ठेवण्यात आले होते. या मठाच्या छतावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

Man falls to death at quarantine centre in Bihar 2 days after returning from abroad
परदेशातून आलेल्या व्यक्तीचा बिहारच्या विलगीकरण केंद्रामध्ये मृत्यू..
author img

By

Published : Jun 5, 2020, 10:15 PM IST

पाटणा : परदेशातून आलेल्या एका व्यक्तीचा बिहारच्या बोधगयामधील विलगीकरण केंद्रामध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, ही व्यक्ती देशात परतून दोनच दिवस झाले होते. विकी असे या व्यक्तीचे नाव होते. तो गोपालगंज जिल्ह्याचा रहिवासी होता.

सौदी अरेबियाच्या जेद्दाहमधून तीन जूनला विकी भारतात परतला होता. त्यानंतर त्याला बोधगयामधील विलगीकरण केंद्रामध्ये रुपांतरीत केलेल्या एका मठामध्ये ठेवण्यात आले होते. या मठाच्या छतावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासणीनुसार, मानसिक तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचे दिसून येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी दिली.

तसेच, ट्रुनॅट तपासणीमध्ये विकीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्याची अधिक तपासणी करण्यात आली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गयाच्या विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : दाऊदला कोरोनाची लागण झाली नाही, भावाने दिली फोनवरून माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.