बसिरहाट (बंगालमधील) - ममता दीदीनी दोन दिवसांपूर्वाच जाहीर केले होते, की त्या बदला घेणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीवर हल्ला करुन २४ तासांत त्यांनी त्यांचा बदला घेण्याचा निश्चय पूर्ण केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील बसिरहाट येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. या सभेत त्यांनी मंगळवारी अमित शाह यांच्या सभेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच या घटनेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार ठरवले.
मोदी म्हणाले, भाजपला ३०० हून अधिक जागा मिळणार आहेत. २०१९ मध्ये ममतांचा सुपडा साफ होईल. ममता यांनी चिटउफंडच्या नावावर गरिबांचे पैसे लुटले. त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाला त्या पंतप्रधान मानतात पण भारताच्या नाही.
ममता यांच्या गुंडांनी अमित शाह यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. बंगालमध्ये लोकशाहीची गळचेपी होत आहे. ममती दीदी हा मोदी तुम्हाला घाबरत नाही, असे ही मोदी म्हणाले.