नवी दिल्ली - मद्यसम्राट विजय मल्ल्या एसबीआय, आयडीबीआय आणि इतरांकडून घेतलेली 9,000 कोटी रुपयांची कर्जाची परतफेड करण्याची वारंवार ऑफर देत आहे. मात्र, ही ऑफर कोणतीही बँक स्वीकारू शकत नाही, असे एका बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले.
माजी राज्यसभेचा सदस्य आणि कर्जामध्ये बुडालेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवल्यामुळे आणि मनीलॉड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याने 2016 मध्ये इंग्लडला पळून गेला होता. त्यानंतर तो सतत कर्जाचे पैसै परत करण्याची ऑफर बँकाना करतो आणि बँकांकडून ती स्वीकारली जात नसल्याची तक्रार तो टि्वटच्या माध्यमातून करत असतो.
विजय मल्ल्या आपल्याकडे कर्जाची परतफेड करण्या ईतका पैसा असल्याचा दावा करत आहे. मात्र, पैसै काही एखाद्या कोठरीत ठेवलेले नाहीत. जेथून काढून तो बँकाना परत देईल आणि क्लीन चिट मिळवेल. मल्ल्याने इतर कोणत्याही व्यावसायिकाप्रमाणे आपला पैसे स्टॉक्स, शेअर्स, बँक खाती आणि मालमत्ता आदी व्यवसायांमध्ये गुंतवलेला आहे, असे एसबीआय यूकेचे माजी सीईओ प्रभाकर काझा म्हणाले.
मल्ल्याला जेव्हा-जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने पैसै परत देण्यास सांगतिले. तेव्हा तो प्रत्येक वेळी एक यादी देतो. त्या दराने जर सर्व गोष्टी कमी केल्या तर परतफेड करेल, अशी अट ठेवतो. एकूणच, सरकारला कर्जाची परतफेड करण्याची वारंवार ऑफर देणं हा फक्त त्याचा प्रचार स्टंट आहे, असे प्रभाकर काजा म्हणाले.
वयाच्या 28 व्या वर्षी 1983 मध्ये यूबी स्पिरिट्सचे चेअरमन बनलेल्या विजय मल्ल्याने 2005 मध्ये किंगफिशर एअरलाइन्स सुरू केली. तथापि, सुरूवातीच्या सात वर्षानंतरच होणाऱया नुकसानीमुळे एअरलाइन्सचे कामकाज बंद करावे लागले. पण, तोपर्यंत त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. माहितीनुसार एकूण 9,000 कोटी रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे.
जेव्हा तुम्ही संकट काळात काही विकता, तेव्हा तुम्हाला माहिती असते की, तुम्हाला मालमत्तेच्या वास्तविक मूल्याच्या 50-70% इतकीच किंमत परत मिळते. सध्या मल्ल्याचीही तीच अवस्था आहे, असेही काजा म्हणाले.
मल्ल्याला त्यांची ऑफर आणखी चांगली करण्याची संधी द्यावी, असा युक्तिवादही प्रभाकर काझा यांनी नाकारला आहे. त्यांची ऑफर योग्य असून त्यांचे आपण एकावे, कदाचीत तो कर्ज परतही करेल, असा युक्तीवाद बऱ्याच लोकांनी केला आहे. मात्र, त्याने ठेवलेल्या अटी कोणतीही बँक स्वीकारू शकत नाही, असेही ते म्हणाले.
'किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बँकांची सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून विजय मल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.