रायबरेली - उत्तर प्रदेशातील उन्नाव घटनेतील पीडितेच्या वाहनाला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 232 वर एका ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात पीडितेची आई आणि मावशीचा मृत्यू झाला उन्नाव घटनेची बाजू मांडणाऱ्या वकिलासह पीडिता गंभीर जखमी झाली आहे.
देशभर गाजलेल्या उन्नाव अत्याचार घटनेतील पीडिता आणि तिचे कुटुंब रायबरेली येथील कारागृात बंद असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २३२ वर गुरबख्श गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. या कारमधून पीडिता तिची आई, मावशी आणि या प्रकरणात पीडितेची बाजू मांडणारा वकील असे चार जण प्रवास करत होते.
अपघातात पीडितची आई आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची आई ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.