नवी दिल्ली - लोकसभेत अध्यक्षांनी आर्टिकल ३७० हटवण्याच्या प्रस्तावावर आवाजी मतदान मागितले. त्यानुसार, मतदान झाले. मात्र, विरोधकांनी मशीनद्वारे मतदानाची मागणी केली. यानंतर झालेल्या मतदानात प्रस्तावाच्या बाजूने ३५१ मते पडली आणि विरोधात ७२ मते पडली. पुन्हा मतदान घेण्यात आले. यामध्ये जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक ३६६ विरुद्ध ६६ मतांनी मंजूर करण्यात आले.
लोकसभेत चर्चेदरम्यान विरोधाकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना गृहमंत्री अमित शाह यांनी चौफेर फटकेबाजी केली.
अमित शाह यांच्या भाषणातील मुद्दे :
- भारताचा पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीरवर दावा. संपूर्ण काश्मीर भारताची शान आणि मुकुट आहे.
- पाकिस्तानशी युद्ध सुरू होते. सेना विजयी होत होती. एकतर्फी शस्त्रविराम कोणी केले? यामुळेच पाकव्याप्त काश्मीरची समस्या निर्माण झाली. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते.
- हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणी नेले? त्याही वेळी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते.
- आर्टिकल ३७० मुळे जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद पसरत आहे.
-
आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३७१ ची तुलना होऊ शकत नाही. आर्टिकल ३७१ मधील तरतुदींना हात लावला जाणार नाही. मनीष तिवारी यांनी विचारलेल्या प्रश्नाला गृहमंत्री शाह यांनी उत्तर दिले.
-
आर्टिकल ३७१ गुजरात आणि महाराष्ट्र राज्यादरम्यान विशेष परिस्थिती, नागालँड, बोडोलँड, मणिपूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील विशेष परिस्थिती यामध्ये तयार करण्यात आले आहे. यामध्ये ए पासून जे पर्यंत कलमे आहेत. या आर्टिकलने भारताच्या एकसंधतेला, अखंडत्वाला आणि विकासाला अडथळा निर्माण केलेला नाही. तेव्हा आम्ही या कलमांना का हात लावू? याविषयी सर्वांनी निश्चिंत रहावे.