नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. यावेळी महायुद्धानंतर एक नवं जग उदयाला आल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी देशाच्या विविधतेचे कौतूक केले. कोरोनाचा काळ हा भारतासाठी टर्निंग पॉईंट ठरल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी आत्मनिर्भर भारत मोहिमेवर जोर दिला. 'व्होकल फॉर लोकल'वरही त्यांनी भाष्य केलं.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
अगदी सर्वात वाईट आणि उलट परिस्थितीतही देशाने मार्ग काढला. राष्ट्रपतींचे भाषण देशवासियांमध्ये विश्वास निर्माण करणार होतं. तसेच महिला सदस्यांच्या सहभागाने सभागृह समृद्ध झालं. लोकसभेतील चर्चेत महिलांनी भाग घेतला. त्या सर्व सदस्यांचा आभार.
भारताने स्वातंत्र्यांची 75 वर्ष पूर्ण करत आहे. हा क्षण गर्वाचा आणि प्रगतीचा आहे. जगासमोर आपण मजबुतीने उभे आहोत. भारत हा काही देशांचा महाद्विप असून याला एक राष्ट्र कुणी करू शकणार नाही, असे ब्रिटीश गव्हर्नर म्हणायचे. मात्र, देशानं तो विचार खोटा ठरवला आहे.
प्रत्येक देशाचा एक मिशन असते. ते त्या देशान पूर्ण करायचं असतं, असं स्वामी विवेकानंद म्हणायचे. दोन महायुद्धानं जग निराश झालेलं होतं. महायुद्धानंतर एक नवं जग उदयाला आलं. लष्कर नाही, तर सहयोग हा मंत्र समोर आला. शांतता प्रस्थापीत करण्यासाठी यूएनची स्थापना झाली. अनेक संस्था उदयाला आल्या. जगात कुणीही शांततेची चर्चा करायला लागले. त्या शांततेच्या चर्चेच्या काळातही सैन्यशक्ती वाढवायला लागले. छोटेमोठे देशही लष्करी बळ वाढवायला लागले.
कोरोना काळानंतरही एक नवं जग तयार होतं आहे. कोरोना काळ भारतासाठी टर्निंग पॉईंट ठरला. भारताने इतर देशांनाही मदत केली. आत्मनिर्भर भारत देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल. आपल्या नसानसात देशभक्ती भरलेली आहे. विविधता असूनही देशाचे लक्ष्य एक आहे.