ETV Bharat / bharat

राहुल गांधींच्या "त्या" वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ - संसदेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकुब

राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उतरले होते. गदारोळ झाल्यामुळे संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.

lok sabha live
लोकसभा
author img

By

Published : Dec 13, 2019, 11:44 AM IST

Updated : Dec 13, 2019, 1:29 PM IST

नवी दिल्ली- राहुल गांधींनी देशातील बलात्काराच्या घटनांवरून केलेल्या वक्तव्यावरून संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उतरले होते. मात्र, सभागृहात गदारोळ सुरू होताच लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर लोकसभेचे कामकाज सुरू होऊन बंद झाले आहे. दरम्यान राज्यसभेचे कामकाज सुरू झाले आहे.

राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि झारखंडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज लोकसभेत उमटले. वायनाडमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी भारत जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी आहे, असे म्हटले होते. तर झारखंडमध्ये त्यांनी भारत 'मेक इन इंडिया' नाही तर रेप इन इंडिया झाला आहे, असे वक्तव्य केले होते. उत्तरप्रदेशात भाजपचा आमदार बलात्कार करतो, त्यानंतर पीडितेचा अपघात होतो. मात्र, मोदी यावर काहीही बोलत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते.

नरेंद्र मोदी म्हणतात, बेटी बचाओ बेटी पढाओ. मात्र, मोदी हे सांगत नाहीत की, बेटींचा कोणापासून बचाव करायचा आहे. तर देशातील मुलींचा भाजपच्या आमदारांपासून बचाव करायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

  • #WATCH Rahul Gandhi, Congress in Godda, Jharkhand: Narendra Modi had said 'Make in India' but nowadays wherever you look, it is 'Rape in India'. In Uttar Pradesh Narendra Modi's MLA raped a woman, then she met with an accident but Narendra Modi did not utter a word. (12.12.19) pic.twitter.com/WnXBz8BUBp

    — ANI (@ANI) December 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधींच्या वक्तव्याचे डीमकेच्या खासदार कनिमोझी यांनी समर्थन केले. मोदी मेक इन इंडिया म्हणतात. त्याचा आम्ही आदर करतो. मात्र, आता देशात जे घडत आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधीनी केला. दुर्दैवाने 'मेक इन इंडिया' यशस्वी होत नसून देशातील महिलांवर बलात्कार होत आहेत. ही चिंतेची बाब आहे, असे कनिमोझी म्हणाल्या.

  • Kanimozhi,DMK on Rahul Gandhi's 'rape in India' remark: PM said 'Make in India', which we respect, but what is happening in country? That is what Rahul Gandhi intended to say. Unfortunately Make in India is not happening&women in the country are being raped. This is a concern pic.twitter.com/sJDyk3gUFo

राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया

राहुल गांधींनी संसदेचीच नव्हे तर संपूर्ण देशाची माफी मागावी

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' या वक्तव्यावर केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत टीका केली. राहुल गांधींच्या वक्तव्याने मीच नाही तर संपूर्ण देशावर आघात झाला आहे. जे नेते असे शब्द वापरतात, त्यांनी संसदेच यावे का? असा प्रश्न त्यांनी केला. त्यांनी संसदेचीच नाही, तर संपूर्ण देशाची माफी मागावी, असे सिंह म्हणाले.

राहुल गांधी मानसिक रुग्ण

राहुल गांधींच्या अशा वक्तव्यामुळे ते मानसिक रुग्ण वाटतात. गांधीनी पंतप्रधानांबद्दल चुकीचे शब्द वापरल्याने त्यांना माफी मागावी लागली होती. राहुल गांधी कधीही देशाचा गौरव पाहू शकत नाही, अशी टीका दिल्ली भाजपचे अध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांनी केली.

भाजप आक्रमक

-

भारताला 'रेप कॅपिटल' म्हणणे योग्य नाही, हा देशाला अपमानीत करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला आमचे सरकार आवडत नाही, हे मान्य आहे. मात्र, अशा पद्धतीने देशाला नावे ठेवणे निंदणीय असल्याचे भाजपचे प्रवक्ते जी. व्ही.एल. नरसिंहा म्हणाले.

Intro:Body:

राहुल गांधीच्या "त्या" वादग्रस्त वक्तव्यानंतर लोकसभेत गदारोळ; कामकाज तहकुब  

नवी दिल्ली- राहुल गांधीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उतरले होते. गदारोळ झाल्यामुळे संसदेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 13, 2019, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.