ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा : स्वबळावर निवडणूक लढवावी ही वडिलांची इच्छा - चिराग पासवान

बिहार निवडणुकीच्या तोंडावर रामविलास पासवान यांचे निधन झाले. त्यामुळे लोकजनशक्ती पक्षाची (एलजेपी) सर्व जबाबदारी चिराग पासवान यांच्या शिरावर येऊन पडली आहे. एकट्याने निवडणूक लढवावी ही वडिलांची इच्छा असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले आहे. ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जातीचे राजकारण, महागठबंधन, बिहार विकास यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

ljp president chirag paswan
चिराग पासवान
author img

By

Published : Oct 16, 2020, 4:19 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच पुत्र चिराग पासवान यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. बिहार निवडणुकीच्या तोंडावर रामविलास पासवान यांचे निधन झाले. त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाची (एलजेपी) सर्व जबाबदारी चिराग पासवानच्या शिरावर येऊन पडली आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली एलजेपी पक्षाने रालोआबरोबरची आघाडी तोडली असून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी ही वडिलांची इच्छा असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले.

'वडील मला कायम म्हणायचे, नेत्याकडे 'नियत' आणि 'निती' पाहिजे. तुझ्याकडे बिहारचा विकास करण्याची इच्छा आहे, तसेच विकासासाठीचे धोरण आहे, त्यामुळे तू एकट्याने निवडणूक लढवावी, चिरागच्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा आहे,' अशी आठवण चिराग पासवान यांनी सांगितली. यावेळी त्यांनी 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या योजनेचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबतच्या बिघडलेल्या संबंधावर विचारले असता, नितीश कुमार पित्रुतुल्य असल्याचे चिराग म्हणाले.

'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट या योजनेमध्ये बिहारमधील सर्व अडचणींचा उल्लेख केला आहे. बिहारच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राजस्थानला का जावे लागते? बिहारी नागरिक रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात का जातात ? मुंबई, दिल्लीचा कोणी विद्यार्थी बिहारला शिक्षणासाठी आला असेल, असे मला कधी दिसले नाही. राज्यातील नेते उपचारासाठी दुसऱ्या राज्यात का जातात? उद्योगधंदे, पायाभूत सुविधा राज्यात का नाहीत ? असे प्रश्न चिराग पासवान यांनी केले.

मला जातीचे राजकारण करायचे नाही

मी एनडीएमध्ये राहीलो असतो तर, जेवढ्या जागा लढलो असतो, त्या सर्व जिंकलो असतो. मात्र, मला जातीचे राजकारण करायचे नाही. मला बिहारचा विकास करायचा आहे. राज्यात उद्योगधंदे आणायचे आहेत. आरोग्य सुविधा सुधारायच्या आहेत. जातीच्या राजकारणात मला पडायचे नाही, असे चिराग यांनी म्हटले.

पंतप्रधानांचा फोटो माझ्या हृदयात

भाजपाने चिराग पासवान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो निवडणुकीत वापरण्यास मनाई केली आहे. यावर विचारले असता ते म्हणाले, मला पंतप्रधान मोदींचा फोटो वापरण्याची गरज नाही. माझी छाती चिरून पाहा, त्यात मोदींचा फोटो आहे. त्यांचे विचार माझ्यासोबत आहेत. मोदींचा फोटो वापरण्याची खरी गरज नितीश कुमारांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फोटो वापरण्याचा प्रकरणावरून गोंधळ घालण्याची गरज नाही, असे चिराग पासवान म्हणाले.

मोदींचा मला दिवसातून दोनदा फोन

पंतप्रधान मोदींचा मला दिवसातून दोनदा फोन यायचा. वडिलांची प्रकृती खराब असताना मोदी कायम त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायचे, असे चिराग पासवान यांनी आवर्जून सांगितले.

नितीश कुमारांना मुख्यमंत्री होताना पाहू शकत नाही

नितीश कुमार यांच्याकडे बिहारच्या विकासाची कोणतीही योजना नाही. ते राज्याला खड्ड्यात घालतील. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होताना मी पाहू शकत नाही. मी भाजपाच्या कायम बरोबर होतो आणि आहे. नितीश कुमारांना राज्यात जागा कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे कितीही जागा आल्या तरी, नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, असे म्हणत आहे. जेडीयूला जागांची चिंता का भासायला लागली. कारण त्यांना जागा कमी होणार आहेत, हे माहीत आहे, असे चिराग पासवान म्हणाले.

भाजपा एलजेपीचे सरकार येईल

बिहार निवडणुकीत एलजेपीच्या किती जागा निवडून येतील असा प्रश्न विचारला असता, किती जागा निवडूण येतील हे मी कधीही निवडणुकीआधी सांगितले नाही. मात्र, नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नसून एलजेपी आणि भाजपा सरकार राज्यात येईल. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, असे चिराग पासवान ठामपणे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.