ETV Bharat / bharat

'भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून तर मेणबत्त्या लावण्याचा उपक्रम नाही ना..?' - एच डी कुमारस्वामी

देशातील डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत. तसेच कोरोनाच्या चाचण्याही सामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध नाहीत. कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहेत हे सांगण्याऐवजी पंतप्रधान जनतेला निरर्थक उपक्रम सुचवत आहेत, असेही कुमारस्वामी म्हणाले.

Lights-out challenge: Kumaraswamy challenges PM Modi to offer 'scientific' explanation
'मोदींनी दिवे लावण्याच्या उपक्रमामागचे शास्त्रीय स्पष्टीकरण द्यावे..'
author img

By

Published : Apr 5, 2020, 1:56 PM IST

बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लोकांना मेणबत्त्या पेटवण्यास सांगितले आहे. असे करण्याने काय फायदा होईल याचे शास्त्रीय स्पष्टीकरण मोदींनी द्यावे, असे आव्हान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मोदींनी दिले आहे.

भाजप स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य..?

सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे. याचेच औचित्य साधून त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला देशभरातील लोकांना दिवे लावण्यास तर नाही सांगितले ना? असा खोचक प्रश्न कुमारस्वामी यांनी विचारला. हे कारण वगळता आणखी कोणते कारण यामागे असू शकते? यामागे काही शास्त्रीय स्पष्टीकरण असल्यास पंतप्रधानांनी ते द्यावे, असे मी त्यांना आव्हान देतो. अशा आशयाचे ट्विट कुमारस्वामी यांनी केले.

देशातील डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत. तसेच कोरोनाच्या चाचण्याही सामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध नाहीत. कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहेत हे सांगण्याऐवजी पंतप्रधान जनतेला निरर्थक उपक्रम सुचवत आहेत, असे ते म्हणाले.

  • The government is yet to provide PPEs for doctors and make test kits affordable for the common man. Without telling the nation what concrete steps are being taken to combat COVID-19 menace, the prime minister is giving meaningless tasks to an already exhausted population.
    2/3

    — H D Kumaraswamy (@hd_kumaraswamy) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जागतिक महामारीचा उपयोग स्वतःच्या चमकोगिरीसाठी आणि पक्षाचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी करून घेणे हे अतिशय लज्जास्पद कृत्य आहे, असेही कुमारस्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • It is shameful to convert the national crisis into an event of self aggrandizement & it is beyond shameful to push the hidden agenda of his party in the face of global calamity. May sense prevail upon the PM;

    ಕರುಣಾಳು ಬಾ ಬೆಳಕೆ
    ಮುಸುಕಿದೀ ಮಬ್ಬಿನಲಿ..
    ಕೈ ಹಿಡಿದು
    ನಡೆಸೆನ್ನನು.....

    3/3

रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन मोदींनी जनतेला केले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अ‌ॅक्टिव रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जवळपास २६७ लोकांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : 'संरक्षक साधनांचा अभाव हे खरे आव्हान'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.