भुवनेश्वर - मातृभाषा ही सर्वात महत्त्वाची असते, कारण ती आईच्या गर्भातून येते. त्यामुळे आपण इतर कोणती भाषा शिकण्याआधी आपली मातृभाषा शिकण्यावर आणि त्याच्या प्रसारावर भर द्यायला हवा, असे मत भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ओडिशामध्ये एका ओडिया भाषेतील दैनिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
-
Vice Pres Venkaiah Naidu: Learning Hindi,Bengali, English,Tamil,Telugu,Kannada or even French,Chinese,no problem, first promote your mother tongue, that's what is required, that's why I stress that govt schools/educational institutes must promote mother tongue upto primary level https://t.co/3ej2aKvc7a
— ANI (@ANI) October 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Vice Pres Venkaiah Naidu: Learning Hindi,Bengali, English,Tamil,Telugu,Kannada or even French,Chinese,no problem, first promote your mother tongue, that's what is required, that's why I stress that govt schools/educational institutes must promote mother tongue upto primary level https://t.co/3ej2aKvc7a
— ANI (@ANI) October 6, 2019Vice Pres Venkaiah Naidu: Learning Hindi,Bengali, English,Tamil,Telugu,Kannada or even French,Chinese,no problem, first promote your mother tongue, that's what is required, that's why I stress that govt schools/educational institutes must promote mother tongue upto primary level https://t.co/3ej2aKvc7a
— ANI (@ANI) October 6, 2019
हिंदी, बंगाली, इंग्रजी, तामिळ, तेलुगु, कन्नड किंवा फ्रेंच, चीनी कोणतीही भाषा शिकावी मात्र, त्याआधी आपल्या मातृभाषेचे संवर्धन करावे हे गरजेचे आहे. त्यासाठीच मी नेहमी प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत असावे, असे म्हणण्यावर भर देतो, असेही नायडू यावेळी म्हणाले.
दरम्यान, 'एक राष्ट्र - एक भाषा' असे म्हणणाऱ्या भाजपसाठी हा घरचा आहेर ठरला आहे. गेल्या महिन्यातच, हिंदीची सक्ती असावी या आशयाच्या वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भारतभरातून टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी, आपण हिंदीची सक्ती असावी, असे बोललोच नव्हतो अशी सारवासारव केली होती. त्यावर आता नायडू यांनी देखील मातृभाषेचे महत्त्व सांगितले आहे.
हेही वाचा : मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेणार पीडीपी नेत्यांचे शिष्टमंडळ...