रांची - राजदचे सर्वेसर्वा आणि चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव संधिवाताने ग्रस्त असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या कारणास्तव त्यांना जास्त चालता-फिरता येत नाही. यादव यांच्यावर उपचार करणार्या डॉ. डी. के. झा यांनी ही माहिती दिली आहे.
लालू प्रसाद यांना संधिवाताचा त्रास आहे. इथे चालायला जागा नसली तरी आम्ही त्यांना फिरण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यांना इतरही अनेक आजार आहेत. सध्या ते ठराविकच आहार घेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लालू प्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्याच्यावर रिम्समध्ये उपचार सुरू होते. 31 ऑगस्ट रोजी येथे दाखल होऊन त्यांना एक वर्ष होईल.
दर शनिवारी तीन लोक रुग्णालयात लालूप्रसादांना भेटू शकतात. लालू यांचे नातेवाईक विमल यादव व इतर दोन जण शनिवारी त्यांना भेटले होते.