लाहौल - सर्वसाधारणपणे आपण एक किंवा 2 किलो एवढे मोठे पत्ता कोबीचे फूल पाहिले असेल. मात्र, हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात 17.2 किलो कोबीच्या फुलाचे उत्पादन घेतले आहे. 17.2 किलो कोबीचे फूल पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होते.
लाहौलच्या रेलिंग गावच्या सुनील कुमार या शेतकऱ्यांने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सुनील कुमार यांनी सेंद्रिय शेतीद्वारे नवीन प्रयोग करत 17.2 किलोचे कोबीचे फूल तयार केले आहे. त्याच्या या प्रयोगाने देशातील कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन केंद्रातील वैज्ञानिकांनाही धक्का बसला आहे.
माझ्या कुटुंबीयांनी सुरवातीपासूनच सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. सहसा कोबीचे फूल दोन किलोचे असते, परंतु यावर्षी त्यांची वाढ 17.2 किलो एवढी झाली, असे शेतकरी सुनील कुमार म्हणाले.
विशेष म्हणजे, लाहौल स्पितीचे बटाटे आणि मटार जगभरात प्रसिद्ध आहेत. या पिकांची येथे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. लाहौलची अर्थव्यवस्था या दोन पिकांवर अवलंबून आहे.