कोलकता- दरवर्षी शहरातील दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी शहरातील दुर्गा पंडाल हे आकर्षणाचे केंद्र असतात. देवीचा देखावे, विद्युत रोषणाई हे दुर्गा उत्सवाचे केंद्रबिंदू असते. बेहालातील बरिशा प्लेयर्स कॉर्नर पुजा पंडाल हे देखील दुर्गा उतस्वात नटलेले असते. ते शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे यंदा काही खबरदारी घेण्यात आली आहे. महाअष्टमीच्या दिवशी नागरिकांना पंडालमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे आयोजन समितीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आयोजकांनी भाविकांसाठी व्हर्च्युअल पुजेचे आयोजन केले आहे. ही व्हर्च्युअल पूजा सोशल मीडियावर उपलब्ध असणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांचे वडील चांदी गंगोपध्याय यांनी या पंडालमध्ये पुजेची सुरुवात केली होती. १९७३ पासून या पंडालमध्ये दुर्गा पुजेचे आयोजन सुरू आहे. तेव्हापासून मोठ्या धूमधडाक्यात या ठिकाणी दुर्गा उतस्व साजरा करण्यात येतो. दरवर्षी दुर्गा उतस्वात बेहालातील बिरेन रॉय इस्ट रोडवर या पंडालची स्थापना केली जाते. सौरव गांधी हे या पंडालला भेट देतात.
दरम्यान, आयपीअल सुरू असताना सौरव गांगुली हे संयुक्त अरब अमिरातमधून परतले आहेत. त्यामुळे, त्यांची पंडालमध्ये पुजेला येण्याची शक्यता आहे. दरम्यान महाअष्टमीच्या दिवशी गर्दी होऊ नये म्हणून आयोजकांन व्हर्च्युअल पुजेचे आयोजन केले आहे. अंजली, संधीपुजो, बिसर्जन यांचे कल्बच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह ब्रॉडकास्टींग होणार आहे. घरूनच पुजा पाहता येणार आहे. तसेच, पंडालमधील नागरिकांना मास्क घालण्याची सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती पुजो समितीच्या सांस्कृतिक सचिव जूही गंगोपाध्याय यांनी दिली.
हेही वाचा- पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे जमा केल्यास आता भरावा लागणार 'इतका' शुल्क