कृष्णगिरी (तामिळनाडू) – ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय तामिळनाडूमधील एका महिलेला आला. तिच्या छातीत खुपसलेला चाकू कोईम्बतूर वैद्यकी महाविद्यालयात डॉक्टरांनी ३० तासानंतर बाहेर काढला. त्यामुळे ती अक्षरश: मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आली आहे.
नाट्यमरित्या वाचलेल्या महिलेच्या छातीत शेजारील व्यक्तीने चाकू खुपसला. ही घटना 25 मे रोजी घडली होती. त्यानंतर ती महिला रात्रभर घरात बसून राहिली. दुसऱ्या दिवशी तिला सकाळी सालेममधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा चाकू तब्बल 30 तासानंतर काढण्यात डॉक्टरांना यश आले. त्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर तीन तास शस्त्रक्रिया कली. ही शस्त्रक्रिया कार्डिओ आणि भूलशास्त्र विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहा इंचचा चाकू तिच्या शरीरात खूपसला होता. मात्र थोडासाच भाग फुफ्फुसापर्यंत गेला होता. आश्चर्य व सुदैवाची गोष्ट म्हणजे तिच्या ह्रदयाला जखम झाली नव्हती. तिला रुग्णालयात आणले होते, तेव्हा तिला शुद्ध होती. चाकूला पुन्हा तिने धक्काही लावला नव्हता. त्यामुळे शरारीच्या अंतर्गत भागात रक्तस्त्राव झाला नव्हता. पूर्ण तब्येत बरी झाल्यानंतर महिलेला तीन दिवसानंतर घरी सोडण्यात आले.