इडुक्की - सध्याच्या काळात लग्नाची, साखरपुढ्याची व प्री-वेडींग फोटोशूटची तारीख ठरवणे ही फॅशन झाली असताना एक असे फोटोशूट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असून व्हायरलही होत आहे. या फोटोशूटमधील जोडप्याने लग्नानंतर बऱ्याच कालावधीनंतर फोटोशूट केले आहे.
तुम्ही विचार करत असाल की, कोरोना लॉकडाऊनच्या काळात लग्न झाले असेल तर तुम्ही चुकताय कारण या जोडप्याचा विवाह तब्बल ५८ वर्षापूर्वी झाला आहे.
कुनझुटी व त्यांची पत्नी चैन्नमा यांचा विवाह १ जानेवारी १९६२ मध्ये झाला आहे. त्यावेळी त्यांनी लग्नात फोटोशूट केले नाही.
त्यानंतर त्यांचा नातू जिबीन याने कोरोनाकाळात आलेल्या लग्नाच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त फोटोशूट करण्याची कल्पना मांडली. जेव्हा लग्नाच्या ५८ वर्षानंतर केरळच्या या बुजुर्ग दाम्पत्याने वेडिंग फोटोशूट केले आणि त्यांचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो त्यांच्या नातवाने शेअर केले आहेत. त्याने म्हटले, की मी जेव्हा माझ्या आजा-आजींना त्यांच्या लग्नातील फोटोबाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, की त्यांच्याकडे त्या काळातील एकही फोटो नाही. त्यानंतर या फोटोशूटचा निर्णय घेतला.
फोटोशूटसाठी दोघांना तयार करण्यात आले होते व निसर्गरम्य लोकेशनवर फोटोशूट करण्यात आले. आजोबा काळ्या रंगाच्या सूटमध्ये तर आजी पांढऱ्या साडीत नव्या नवरीसारखी दिसत आहे. फोटोमध्ये दोघांमध्ये दिसत असलेल्या केमेस्ट्रीने सोशल मीडियावर फोटोंचे कौतुक होत आहे.
कुनझुटी सध्या ८५ तर चैन्नमा ८० वर्षाच्या आहेत.या दाम्पत्याला ३ मुले व ६ नातवंडे आहेत. त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना व लोकांनी हे फोटो पसंत पडत असताना त्यांनी केवळ एकाच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणजे हॅप्पी..