पलकक्कड - केरळमधील गर्भवती हत्तीणीचा मृत्यू हा स्फोटक पदार्थांनी भरलेले फळ खाल्ल्याने झाला आहे. स्फोटकांनी भरलेले फळ हे रानडुकरांना मारण्यासाठी ठेवल्याचे आरोपीने सांगितले आहे.
हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चलिक्कल ओथुकुमपुरम इस्टेटच्या कोट्टोपाडम पंचायतमध्ये रबर टॅपिंगचे काम करणार्या विल्सनला नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी विल्सनने सांगितले की, स्फोटकांनी भरलेले फळ खाण्याचा प्रयत्न केला असताना हत्तीणीचा मृत्यू झाला.
रानडुकरांची शिकार करण्यासाठी त्याने फळाच्या आत स्फोटके लपवल्याचे पोलीस चौकशीत विल्सनने सांगितले. दरम्यान, विल्सन वन्य प्राण्यांच्या मांसाच्या बेकायदेशीर विक्रीतही सामील असल्याचे तपासात उघड झाले आहे.
सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क येथे फटाक्यांनी भरलेले फळ खायचा प्रयत्न केला असता, स्फोट होऊन गर्भवती हत्तीण गंभीर जखमी झाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला. हत्तीणीच्या झालेल्या अशा मृत्यूनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे.