ETV Bharat / bharat

चारधाम यात्रा 2019 : ब्राह्ममुहुर्तावर उघडले भगवान केदारनाथाचे दरवाजे, मंदिराबाहेर भक्तांच्या रांगा - chardham

हिंदूच्या चार धाम श्रद्धास्थानांपैकी गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धाम मंगळवारी भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. उद्या बद्रीनाथचेही दरवाजे पुन्हा उघडण्यात येतील. आज येथे अखंड ज्योतीचा अनुभव घेता येईल. भैरव मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर मंदिरातील मुख्य पूजन सुरू होईल.

केदारनाथ
author img

By

Published : May 9, 2019, 11:43 AM IST

डेहराडून - उत्तराखंडमधील गढवाल हिमालय रांगांमधील केदारनाथ मंदिरात दरवाजे आज पहाटे ब्राह्ममुहुर्तावर उघडले. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात ६ महिन्यांच्या हिवाळी विरामानंतर मंदिर भाविकांसाठी खुले झाले. मंदिराचे दरवाजे फुलांनी सजवण्यात आले आहेत. येथील भगवान शंकराची मूर्ती हिवाळ्यादरम्यान उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात ठेवण्यात आली होती. ती भैरवनाथ पूजनानंतर केदारनाथमध्ये पुनर्स्थापित करण्यात आली.

केदारनाथाची पालखी गौरीकुंडमार्गे केदारनाथ येथे आणण्यात आली. हिंदूंच्या चार धाम श्रद्धास्थानांपैकी गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धाम मंगळवारी भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. उद्या बद्रीनाथचेही दरवाजे पुन्हा उघडण्यात येतील. आज येथे अखंड ज्योतीचा अनुभव घेता येईल. भैरव मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर मंदिरातील मुख्य पूजन सुरू होईल. हे ५ हजार १०० वर्षे जुने मंदिर असून ते पांडवांनी बांधले होते. कौरवांचा नाश केल्यानंतर पांडव पापविमोचनासाठी येथे आले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

चार धाम यात्रा आणि केदारनाथ मंदिर दरवर्षी अनेक पर्यटक आणि भाविकांचे आकर्षण असते. हे मंदिर समुद्रसपाटीपासून ११ हजार ७५५ फूट उंचावर आहे. उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाने भाविकांना गरम कपडे आणि आवश्यक औषधे सोबत ठेवण्यास सांगितले आहे. गौरीकुंडपासून केदारनाथपर्यंतच्या गिर्यारोहण मार्गावर ३ हजार यात्रेकरूंसाठी वीज, पाणी, आरोग्य आणि सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच, शासनाने पर्यटकांसाठी निवाऱ्याचीही सोय केली आहे.

Intro:Body:

चारधाम यात्रा 2019 : ब्राह्ममुहुर्तावर उघडले भगवान केदारनाथचे दरवाजे, मंदिराबाहेर भक्तांच्या रांगा

डेहराडून - उत्तराखंडमधील गढवाल हिमालय रांगांमधील केदारनाथ मंदिरात दरवाजे आज पहाटे ब्राह्ममुहुर्तावर उघडले. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात ६ महिन्यांच्या हिवाळी विरामानंतर मंदिर भाविकांसाठी खुले झाले. मंदिराचे दरवाजे फुलांनी सजवण्यात आले आहेत. येथील भगवान शंकराची मूर्ती हिवाळ्यादरम्यान उखीमठ येथील  ओंकारेश्वर मंदिरात ठेवण्यात आली होती. ती भैरवनाथ पूजनानंतर केदारनाथमध्ये पुनर्स्थापित करण्यात आली.

केदारनाथाची पालखी गौरीकुंडमार्गा केदारनाथ येथे आणण्यात आली. हिंदूच्या ४ धाम श्रद्धास्थानांपैकी गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धाम मंगळवारी भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. उद्या बद्रीनाथचेही दरवाजे पुन्हा उघडण्यात येतील. आज येथे अखंड ज्योतीचा अनुभव घेता येईल. भैरव मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर मंदिरातील मुख्य पूजन सुरू होईल. हे ५ हजार १०० वर्षे जुने मंदिर असून ते पांडवांनी बांधले होते. कौरवांचा नाश केल्यानंतर पांडव पापविमोचनासाठी येथे आले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

चार धाम यात्रा आणि केदारनाथ मंदिर दरवर्षी अनेक पर्यटक आणि भाविकांचे आकर्षण असते. हे मंदिर समुद्रसपाटीपासून ११ हजार ७५५ फूट उंचावर आहे. उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाने भाविकांना गरम कपडे आणि आवश्यक औषधे सोबत ठेवण्यास सांगितले आहे. गौरीकुंडपासून ते केदारनाथपर्यंतच्या गिर्यारोहण मार्गावर ३ हजार यात्रेकरूंसाठी वीज, पाणी, आरोग्य आणि सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच, शासनाने पर्यटकांसाठी निवाऱयाचीही सोय केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.