ETV Bharat / bharat

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान लवकरच पर्यटकांसाठी खुले! - काझीरंगा उद्यान पर्यटक खुले

यापूर्वी पाच ऑक्टोबरला उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचा विचार प्रशासन करत होते. मात्र, महापुरामुळे हा निर्णय पुढे ढकलावा लागला. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते..

Kaziranga National Park to reopen for tourists on October 21
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान लवकरच पर्यटकांसाठी खुले!
author img

By

Published : Oct 19, 2020, 3:04 PM IST

दिसपूर - एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणारे आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आता पर्यटकांसाठी खुले होण्यास सज्ज झाले आहे. २१ ऑक्टोबरपासून पर्यटकांना या उद्यानाची सफर करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल आणि वनमंत्री परिमल शुक्ला हेदेखील याचदिवशी या उद्यानाची सफर करणार आहेत.

यापूर्वी पाच ऑक्टोबरला उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचा विचार प्रशासन करत होते. मात्र, महापुरामुळे हा निर्णय पुढे ढकलावा लागला. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.

कोरोनासाठी विशेष खबरदारी..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यान पर्यटकांसाठी खुले करताना विशेष काळजी घेण्यात येणार आहे. स्वसुरक्षेसाठीचे सर्व नियम पाळणे पर्यटकांना बंधनकारक असणार आहेत.

पर्यटकांची संख्या रोडावली..

यावर्षी कोरोना महामारीमुळे आणि महापुरामुळे काझीरंगा उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता कोरोना नंतरच्या काळात (पोस्ट कोविड एरा) काझीरंगाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्याचे आवाहन प्रशासनासमोर असणार आहे.

हेही वाचा : 'आम्हाला घरी पोहचवा, आम्ही तुम्हाला मतदान करू', बिहारी कामगारांची नेत्यांना ऑफर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.