ETV Bharat / bharat

संतापजनक.. दलित असल्याने भाजप खासदाराला मंदिर प्रवेश नाकारला - मंदीर प्रवेश बातमी

तुमकूर जिल्ह्यातील पेमानहळ्ळी आणि गोलार हट्टी गावांना भेट देण्यास खासदार महाशय गेले होते. त्यावेळी नारायणस्वामी यांना गावातील लोकांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं.

नारायणस्वामी
author img

By

Published : Sep 17, 2019, 2:53 PM IST

Updated : Sep 17, 2019, 3:54 PM IST

बंगळुरू- देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटून गेला तरीही अस्पृश्यता समूळ नष्ट झालेली नाही. कर्नाटकामध्ये एका खासदाराला दलित असल्यामुळे मंदिरामध्ये जाण्यापासून गावातील लोकांनी रोखलं. चित्रदुर्ग जिल्ह्याचे खासदार एन. नारायणस्वामी यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला.

तुमकूर जिल्ह्यातील पेमानहळ्ळी आणि गोलार हट्टी गावांना भेट देण्यास खासदार महाशय गेले होते. त्यावेळी नारायणस्वामी यांना गावातील लोकांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं. दलितांना आम्ही आमच्या पवित्र मंदीरांपासून कायम दुर ठेवलं आहे. आम्ही पिढीपार ही परंपरा पाळत आलोयं. त्यामुळे तुम्हालाही मंदिरामध्ये जाण्यापास परवानगी नाही, असे गावातील लोकांनी त्यांना सांगितले.

अशा अंधश्रद्धा आणि खोट्या समजूती लोकांमधून गेल्या पाहिजेत. या बाबत जनजागृती मोहीम राबवण्यात यावी, असे खारदार नारायणस्वामी यांनी म्हटले आहे. संसदेमध्ये लोकांना आवाज मांडणाऱ्या प्रतिनिधीला जर अस्पृश्यतेचा सामना करावा लागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांबद्दल न बोललेलंच बरे.

Intro:Body:

unmannned drdo palne crashed in karnataka

डीआरडीओचे मानवरहित विमान कर्नाटक राज्यामध्ये कासळले

कर्नाटक- कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) मानवरहित विमान कोसळले. विमान जिल्ह्यातील जोडीचिक्केनहळ्ळी या दुर्गम खेड्यामध्ये कोसळले. विमान पडल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

चित्रदुर्ग जिल्ह्यातील चालाकारे तालुक्यात असलेल्या डीआरडीओ संस्थेचे हे विमान होते. विमान अपघातात कोणी जखमी किंवा मृत झाले असतील अशी शक्यता गावकऱ्यांना होती. मात्र, नंतर मानवरहित विमान असल्याचे स्पष्ट झाले.

Conclusion:
Last Updated : Sep 17, 2019, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.