बंगळुरू- गेल्या ५ महिन्यात कर्नाटक राज्यात २० लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यामुळे कर्नाटक राज्य हा देशातील सर्वात जास्त कोरोना चाचणी करणारे राज्य ठरले आहे.
२६ मार्च ते १६ ऑगस्ट या काळात राज्याने २० लाखापेक्षा जास्त कोरोना चाचण्या केल्या आहेत. सुरुवातीच्या १ लाख चाचण्या करण्यासाठी राज्याला ९९ दिवस लागले होते. मात्र, आता १ लाख चाचण्या करण्यासाठी दोनच दिवसाचा कालावधी लागत आहे. राज्यात दर दिवशी १०१ प्रयोग शाळांमध्ये जवळपास ५० हजार कोरोना चाचण्या होतात.
मार्च महिन्यात केवळ २ हजार चाचण्या, नंतर वाढला वेग
मार्च महिन्यात राज्याने केवळ २ हजार ३०९ कोरोना चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर कोरोना चाचणीचा वेग वाढवण्यात आला. त्यानंतर, एप्रिल महिन्यात ५५ हजार २१ चाचण्या करण्यात आल्या. मे महिन्यात २.४ लाख, जून महिन्यात ३.२ लाख, जुलै महिन्यात ७.६ लाख आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १६ दिवसात ६.८ लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- कर्नाटक: कारच्या टायरची हवा काढल्याने चक्क पोलिसाचे तहसीलदाराविरोधात धरणे