ETV Bharat / bharat

धक्कादायक..! कन्हैया कुमारच्या ताफ्यावर पुन्हा हल्ला - Kanhaiya Kumar Attacked By Angry Mob

आज पुन्हा एकदा कन्हैय्या कुमारवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिहारमधील जमुई येथील स्थानिक लोकांनी कन्हैया कुमारच्या ताफ्यावर अंडे आणि ज्वलनशील पदार्थ फेकल्याची माहिती आहे.

कन्हैया कुमार
कन्हैया कुमार
author img

By

Published : Feb 10, 2020, 3:20 PM IST

जमुई - जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांच्या ताफ्यावर बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा कन्हैय्या कुमारवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिहारमधील जमुई येथील स्थानिक लोकांनी कन्हैया कुमारच्या ताफ्यावर अंडे आणि ज्वलनशील पदार्थ फेकल्याची माहिती आहे.

कन्हैय्या कुमार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात जमुई येथे सभा घेण्यासाठी जात होते. यावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला होण्याची ही चौथी वेळ असून यापूर्वी सोपावूल, कटिहार आणि छपरामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (NRP) याविरोधात कन्हैया कुमार याने जन-गण-मन यात्रा काढली आहे. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या यात्रेदरम्यान कन्हैया कुमार बिहारमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. यादरम्यान त्याच्या तब्बल ५० सभा होणार आहेत. बेतिया येथून ३० जानेवारीपासून जन-गण-मन यात्रेची सुरुवात झाली होती.

Intro:Body:

धक्कादायक : कन्हैया कुमारच्या ताफ्यावर पुन्हा हल्ला

जमुई - जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांच्या ताफ्यावर बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा कन्हैय्या कुमारवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिहारमधील जमुई येथील स्थानिक लोकांनी कन्हैया कुमारच्या ताफ्यावर अंडे आणि ज्वलनशील पदार्थ फेकल्याची घटना घडली आहे.

कन्हैय्या कुमार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात सभा घेण्यासाठी जात होते. यावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला होण्याची ही चोथी वेळ असून यापूर्वी सोपावूल, कटिहार आणि छपरामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (NRP) याविरोधात कन्हैया कुमार याने जन-गण-मन यात्रा काढली आहे. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या यात्रेदरम्यान कन्हैया कुमार बिहारमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. यादरम्यान त्याच्या तब्बल ५० सभा होणार आहेत. बेतिया येथून ३० जानेवारीपासून जन-गण-मन यात्रेची सुरुवात झाली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.