ETV Bharat / bharat

कमलेश तिवारी हत्या प्रकरण : तीनही आरोपींनी दिली गुन्ह्याची कबूली... - कमलेश तिवारी हत्या

कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तीनही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. कमलेश यांनी २०१५ला केलेल्या एका भडकाऊ भाषणाचा राग मनात धरुन या तिघांनी कमलेश यांचा खून केला असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले.

Kamlesh Tiwari Murder case
author img

By

Published : Oct 19, 2019, 1:57 PM IST

गुजरात - कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तीनही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक हिमांशू शुक्ला यांनी ही माहिती दिली. लखनऊ येथे हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची भरदिवसा त्यांच्या कार्यालयातच गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

  • #WATCH Uttar Pradesh DGP, OP Singh on Hindu Samaj Party leader #KamleshTiwari's murder: During the initial interrogation they (accused detained by Gujarat ATS) have accepted that they were involved, and that all three are linked to the case in some manner. pic.twitter.com/KdcX2FzmDZ

    — ANI (@ANI) October 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याबाबत अधिक माहिती देताना उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले, की चौकशीदरम्यान या तीनही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. कमलेश यांनी २०१५ला केलेल्या एका भडकाऊ भाषणाचा राग मनात धरुन या तिघांनी कमलेश यांचा खून केला. एकूण पाहता, हा एक नियोजनबद्ध हल्ला होता.
  • #WATCH Uttar Pradesh DGP, OP Singh on Hindu Samaj Party leader #KamleshTiwari's murder: The inciting speech that the victim had given in 2015 was a reason behind this. As per the information that we have received, it seems it was done in a planned manner. pic.twitter.com/lWV4DTI0t6

कमलेश तिवारी यांची त्यांच्या कार्यालयातच हत्या झाली होती. हत्येपूर्वी हल्लेखोरांनी तिवारी यांच्याशी अर्धा तास चर्चा केली, त्यानंतर मिठाईच्या डब्यातून चाकू बाहेर काढला आणि गळा चिरून त्यांना ठार मारले. याआधी त्यांनी तिवारी यांच्या सेवकाला मसाला आणि सिगारेट आणण्यासाठी बाहेर पाठवले. तो परत येईपर्यंत, हल्लेखोर तिवारींना ठार मारून फरार झाले होते. तिवारी यांचे सेवक स्वराष्ट्रजीत सिंह यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली.हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये हिंदु समाज पक्षाची स्थापना केली. तिवारी यापूर्वी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. कमलेश तिवारी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याशी संबंधित वादग्रस्त टीका केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला होता. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांच्याविरूद्ध एनएसए रद्द केले होते.

हेही वाचा : कमलेश तिवारींची अमानुष हत्या देश, धर्म, हिंदुत्वासाठी मोठा आघात - साध्वी प्रज्ञा सिंग

Intro:Body:

Kamlesh Tiwari Murder case  All three accused have confessed to the crime

Kamlesh Tiwari, Kamlesh Tiwari Murder case, Kamlesh Tiwari Murder, कमलेश तिवारी, कमलेश तिवारी हत्या, कमलेश तिवारी हत्या प्रकरण

कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तीनही  आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. कमलेश यांनी २०१५ला केलेल्या एका भडकाऊ भाषणाचा राग मनात धरुन या तिघांनी कमलेश यांचा खून केला असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले.

कमलेश तिवारी हत्या प्रकरण : तीनही आरोपींनी दिली गुन्ह्याची कबूली...

गुजरात - कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तीनही  आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक हिमांशू शुक्ला यांनी ही माहिती दिली. लखनऊ येथे हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची भरदिवसा त्यांच्या कार्यालयातच गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती देताना उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले, की चौकशीदरम्यान या तीनही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. कमलेश यांनी २०१५ला केलेल्या एका भडकाऊ भाषणाचा राग मनात धरुन या तिघांनी कमलेश यांचा खून केला. एकूण पाहता, हा एक नियोजनबद्ध हल्ला होता.

कमलेश तिवारी यांची त्यांच्या कार्यालयातच हत्या झाली होती. हत्येपूर्वी हल्लेखोरांनी तिवारी यांच्याशी अर्धा तास चर्चा केली, त्यानंतर मिठाईच्या डब्यातून चाकू बाहेर काढला आणि गळा चिरून त्यांना ठार मारले. याआधी त्यांनी तिवारी यांच्या सेवकाला मसाला आणि सिगारेट आणण्यासाठी बाहेर पाठवले. तो परत येईपर्यंत, हल्लेखोर तिवारींना ठार मारून फरार झाले होते. तिवारी यांचे सेवक स्वराष्ट्रजीत सिंह यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली.

हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये हिंदु समाज पक्षाची स्थापना केली. तिवारी यापूर्वी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. कमलेश तिवारी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याशी संबंधित वादग्रस्त टीका केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला होता. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांच्याविरूद्ध एनएसए रद्द केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.