हैदराबाद - जगभरात 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. निरोगी वातावरण हा स्थिर आणि उत्पादक समाजाचा पाया आहे, असे हा दिवस साजरा करण्यातून अधोरेखित होते. आत्ताची पिढी आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांच्या चांगल्या जीवनासाठी हा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. निरोगी पर्यावरण ठेवणे अंत्यत गरजेचे बनले असून जंगलतोड, अवैध वन्यप्राणी तस्करी, प्रदूषण आणि प्लास्टिक केमिकलचा वापर हे निसर्गासाठी धोके बनले आहेत.
पृथ्वीने आपल्याला पाणी, हवा, माती, खनिजे, झाडे, प्राणी आणि अन्न या मुलभूत गरजेच्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण निसर्ग स्वच्छ आणि निरोगी ठेवायला हवा. आद्यौगिक विकास आणि इतरही अनेक घटक निसर्गाच्या ऱ्हासासाठी जबाबदार आहेत. आपण जे काही करतो, त्याचा जागतिक परिणाम होतो. कारण जग ऐनकेनप्रकारे जोडले गेले आहे.
येणाऱ्या काळात सर्वजण नष्ट होणार असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन हा प्रमुख मुद्दा बनला आहे. निसर्गातील संसाधनांचा ऱ्हास होत असल्याचे अनेक डॉक्युमेंटरीमधून स्पष्ट झाले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस जागतिक तापमानातही वाढ होत आहे. वादळे आणि समुद्र पातळीही दिवसेंदिवस वाढत आहे. हिमनद्या वितळत असल्याने आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
नैसर्गिक संसाधनांनी आपण सर्वजण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. मात्र, अशाश्वत पद्धतीमुळे निसर्गाला धोका निर्माण झाला आहे. निसर्ग जतन करण्यात आणि शाश्वत विकास करण्यात आव्हाने निर्माण झाले आहे. निसर्ग स्वत:साठी जतन करण्याची मागणी करत नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या भल्यासाठी निसर्गाचे जतन करणे गरजेचे बनले आहे.
जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचा इतिहास माहित नाही. मात्र, सर्वांनी एकत्र येऊन निसर्गाचे शोषण न करता त्याचे जतन करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. नैसर्गिक संसाधनांचे योग्य रितीने जतन करुन त्यांचा योग्यपणे वापर करण्याची गरज आहे. निसर्गाच्या असमतोलामुळे ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक आपत्ती, विविध आजार, तामपानात वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना आणखीन धोका निर्माण झाला आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी जगभरात जनजागृती करणे अंत्यत गरजेचे आहे. या दिवशी निसर्ग संवर्धन करण्याच आपण सर्वजण मिळून संकल्प करु, त्यामुळे येणाऱ्या पिढ्या आणि आपणही सुरक्षित राहू.