नवी दिल्ली - भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप नाकारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष पीठाकडून आज या प्रकरणावर सुनावणी घेतली जाणार आहे. एका महिलेने सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याविषयीचे सविस्तर वृत्त ४ वृत्तसंस्थांनी दिले होते.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हे आरोप नाकारले असून या आरोपांमुळे अत्यंत दुःख झाल्याचे म्हटले आहे. 'या आरोप करणाऱ्या महिलेमागे कोणती तरी मोठी शक्ती उभी आहे. न्यायव्यवस्थेला धमकावले जात आहे. न्यायव्यवस्थेला अत्यंत गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे खालच्या पातळीचे कारस्थान आहे. मी अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या आरोपांना उत्तर देऊन स्वतः खालच्या पातळीवर उतरणे योग्य समजत नाही,' असे सरन्यायाधीश गोगोई यांनी म्हटले आहे.
-
CJI on sexual harassment allegations against him says independence of judiciary is under very very serious threat and there is a “larger conspiracy” to destabilise the judiciary. He says there is some bigger force behind the woman who made sexual harassment charges. https://t.co/tc05vQcBZK
— ANI (@ANI) April 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CJI on sexual harassment allegations against him says independence of judiciary is under very very serious threat and there is a “larger conspiracy” to destabilise the judiciary. He says there is some bigger force behind the woman who made sexual harassment charges. https://t.co/tc05vQcBZK
— ANI (@ANI) April 20, 2019CJI on sexual harassment allegations against him says independence of judiciary is under very very serious threat and there is a “larger conspiracy” to destabilise the judiciary. He says there is some bigger force behind the woman who made sexual harassment charges. https://t.co/tc05vQcBZK
— ANI (@ANI) April 20, 2019
प्रसारमाध्यमांनी महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देताना संयम बाळगावा, असे आवाहनही केले आहे. महिलेच्या आरोपांची शहानिशा न कता बातम्या देण्यामुळे न्याययंत्रणेचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त केली आहे. सरन्यायाधीशांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.
'न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. इतक्या खालच्या पातळीच्या आरोपांमुळे दुःख होत आहे. ४ माध्यम संस्थांनी जास्तच सविस्तरपणे याविषयीच्या बातम्या प्रसारित केल्या आहेत. माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे,' असे गोगोई म्हणाले.