नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे याआधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर, नड्डा हे कार्यकारी अध्यक्ष होते.
-
Jagat Prakash Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party (BJP) pic.twitter.com/ek5PlEZ2sE
— ANI (@ANI) 20 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jagat Prakash Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party (BJP) pic.twitter.com/ek5PlEZ2sE
— ANI (@ANI) 20 January 2020Jagat Prakash Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party (BJP) pic.twitter.com/ek5PlEZ2sE
— ANI (@ANI) 20 January 2020
कोण आहेत जे. पी. नड्डा..?
जगत प्रकाश नड्डा हे हिमाचल प्रदेशमधील खासदार आहेत. पक्षामध्ये त्यांना 'मास्टर स्ट्रॅटजिस्ट' म्हणून ओळखले जाते. नड्डा हे कायम वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहिले आहेत. अमित शाह आणि मोदी यांच्या मर्जीतले, अशीही त्यांची ओळख आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर नड्डा यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.
- नड्डा यांचा जन्म २ डिसेंबर १९६०ला पाटणामध्ये झाला होता.
- १९७५ला त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
- पाटणा विद्यापीठात शिकत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सहभाग घेतला, आणि अभाविपच्या तिकिटावर निवडून येत त्यांनी सचिवपदावर बाजी मारली.
- हिमाचल प्रदेश विद्यापीठातून त्यांनी आपली एलएलबीची पदवी प्राप्त केली.
राजकीय कारकीर्द..
- १९८७ मध्ये सरकारविरोधी मोहीम राबवल्यामुळे ४५ दिवसांची कैद.
- १९८९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपच्या युवा मोर्चाचे निवडणूक अध्यक्षपद मिळवले.
- १९९१ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
- आपल्या हिमाचल प्रदेश राज्यामधून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले..
- कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तीन वेळा हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केले.
- २००७ ला मिळाले वनमंत्रीपद.
- वनप्रदेशातील गुन्ह्यांवर आवर घालण्यासाठी विशेष असे फॉरेस्ट पोलीस ठाण्यांची स्थापना केली..
- राज्यसभेमध्ये दोन वेळा झाली निवड. (२०१२, २०१८)
- मोदी सरकारमध्ये (२०१४-२०१९) आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले.
नड्डांनी स्वीकारला पदभार..
भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज भाजप मुख्यालायत आपला पदभार स्वीकारला. यावेळी पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह त्यांच्यासोबत उपस्थित होते.
-
#WATCH Jagat Prakash Nadda takes over as National President of Bharatiya Janata Party (BJP) after being elected unopposed. pic.twitter.com/ZzADQd3WOX
— ANI (@ANI) 20 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Jagat Prakash Nadda takes over as National President of Bharatiya Janata Party (BJP) after being elected unopposed. pic.twitter.com/ZzADQd3WOX
— ANI (@ANI) 20 January 2020#WATCH Jagat Prakash Nadda takes over as National President of Bharatiya Janata Party (BJP) after being elected unopposed. pic.twitter.com/ZzADQd3WOX
— ANI (@ANI) 20 January 2020
जे. पी. नड्डा यांच्या अभिनंदनासाठी विशेष कार्यक्रम..
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जे. पी. नड्डांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या अभिनंदनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि इतर नेते उपस्थित होते.
-
Delhi: Prime Minister Narendra Modi, Senior leaders LK Advani, Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari and others at felicitation programme of BJP National President Jagat Prakash Nadda. pic.twitter.com/SwnszbDEne
— ANI (@ANI) 20 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Prime Minister Narendra Modi, Senior leaders LK Advani, Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari and others at felicitation programme of BJP National President Jagat Prakash Nadda. pic.twitter.com/SwnszbDEne
— ANI (@ANI) 20 January 2020Delhi: Prime Minister Narendra Modi, Senior leaders LK Advani, Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari and others at felicitation programme of BJP National President Jagat Prakash Nadda. pic.twitter.com/SwnszbDEne
— ANI (@ANI) 20 January 2020
पंतप्रधान मोदींनी केले नड्डांचे अभिनंदन..
जे. पी. नड्डा यांच्या अभिनंदनासाठी आयोजित केलेल्या एका विशएष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की नड्डा जी माझे जुने मित्र आहेत. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता हा त्याच्या खांद्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत, स्वतःसोबत पक्षालाही पुढे नेत असतो. मी पाहिले आहे, की नड्डा हे ती जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. मला खात्री आहे, की त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नक्कीच प्रगती करेल.
-
PM Narendra Modi: I am confident that under his (#JPNadda) leadership, party will go ahead by abiding its basic principles and ideologies. We will have to face more challenges than what we faced as a political party in the opposition. https://t.co/QGHI2Ykxim
— ANI (@ANI) 20 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM Narendra Modi: I am confident that under his (#JPNadda) leadership, party will go ahead by abiding its basic principles and ideologies. We will have to face more challenges than what we faced as a political party in the opposition. https://t.co/QGHI2Ykxim
— ANI (@ANI) 20 January 2020PM Narendra Modi: I am confident that under his (#JPNadda) leadership, party will go ahead by abiding its basic principles and ideologies. We will have to face more challenges than what we faced as a political party in the opposition. https://t.co/QGHI2Ykxim
— ANI (@ANI) 20 January 2020