नवी दिल्ली - देशातील रोजगाराची स्थिती 2018-19 या वर्षामध्ये सुधारल्याचे सरकारी आकडेवारीतुन पुढे आले आहे. या वर्षात बेरोबजगारीचा दर 6.1 वरून कमी होऊन 5.8 झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
2018-19 वर्षात लेबर फोर्स पार्टिशिपेशन रेट (LFPR) 36.9 वरून वाढून 37. 5 टक्के झाला आहे. सांख्यिक मंत्रालयाने घेतलेल्या लेबर फोर्स सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. रोजगार असणाऱ्यांच्या तुलनेत बेरोजगारांची टक्केवारी किती आहे त्यावरून बेरोजगारीचा दर ठरवला जातो.
2017-18 या वर्षांत कामगार लोकसंख्या प्रमाण (WPR) म्हणजेच लोकसंख्येतील रोजगार असणाऱयांची संख्या 35.3 वरून वाढून 36.9 टक्के झाली आहे. रोजगारातील ही वाढ ग्रामीण तसेच शहरी भागांतील पुरुष आणि महिला दोहोंमध्ये दिसून आली आहे.
2018- 19 वर्षात शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण 6.2 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आले आहे, तर ग्रामाण भागातील बेरोजगारी 5.3 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे 2017 साली घेण्यास सुरुवात केली आहे. त्याद्वारे कमी कालावधीतील रोजगाराची स्थिती समजून येते.