नवाडा - समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार आझम खान यांनी गुरुवारी लोकसभेत भाजप खासदार रमा देवी यांच्यावर विवादास्पद टिप्पणी केली होती. परंतु, आझम खान यांच्या टिप्पणीवर बरीच टीका झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आझम खान यांना माफी मागा किंवा राजीनामा द्या, असे आदेश दिले होते. आता हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आझम खान यांचा बचाव करताना स्वत: विवादास्पद टिप्पणी केली आहे.
मांझी म्हणाले, भाऊ-बहीण एकमेकांना भेटताना चुंबन घेतात. हे सेक्स करण्याच्या बरोबर आहे का? आई त्याच्या मुलाचे चुंबन घेतले तर, तो सेक्स ठरतो का? याप्रमाणेच आझम खान यांच्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे परंतु, राजीनामा देण्याची गरज नाही.
आझम खानच्या विवादास्पद टिप्पणीनंतर भाजप खासदारांनी आझम खान यांना माफी मागण्यास सांगितले होते. परंतु, आझम खान यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. आझम खान म्हणाले, मी जर संसदेत काही चुकीची टिप्पणी केली असेल तर, राजीनामा देईल. परंतु, मी माफी मागणार नाही. लोकसभा अध्यक्षांनी विविध पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेणार आहे, असे स्पष्ट केले आहे.